शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वीस टक्के व्याजाने सावकारी करणाऱ्या महिलेविरोधात सांगलीत गुन्हा

By संतोष भिसे | Updated: January 12, 2024 16:51 IST

Sangli News: कर्जाची मुद्दलासह परतफेड करूनही आणखी एक लाख रुपयांसाठी रिक्षा चालकाला शिवीगाळ करणाऱ्या खासगी सावकार महिलेविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

- संतोष ‌‌भिसेसांगली - कर्जाची मुद्दलासह परतफेड करूनही आणखी एक लाख रुपयांसाठी रिक्षा चालकाला शिवीगाळ करणाऱ्या खासगी सावकार महिलेविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. अलका दत्तात्रय शिकलगार (रा. कोल्हापूर रस्ता, सांगली) असे तिचे नाव आहे. या प्रकरणी दिगंबर प्रभाकर कांबळे (वय ४३, रा. खणभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले की, कांबळे यांचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आहे. २०१८ मध्ये वडापावच्या व्यवसायासाठी त्यांना पैशांची गरज होती. यासाठी त्यांनी अलका शिकलगार यांच्याकडे ८५ हजार रुपयांची गरज असल्याचे सांगितले. शिकलगार यांनी आठवड्याला २० टक्के व्याजाने पैसे देण्याची तयारी दर्शविली. पण ही रक्कम बिनव्याजी घेतल्याचे करारपत्र करून घेतले. १२ सप्टेंबर २०१८ रोजी ८५ हजार रुपये दिले. या पैशांच्या परतफेडीपोटी कांबळे यांनी शिकलगार यांना वेळोवेळी ८५ हजार रुपये दिले. परतफेड झाली, तरी शिकलगार यांनी आणखी १ लाख ६० हजार रुपयांची मागणी केली. कांबळे परतफेड झाल्याचे सांगितले असता, २० टक्के व्याज आकारणीचा हिशेब सांगितला. ८५ हजार रुपयांचे कर्ज आठवड्याला २० टक्के व्याजदराने दिले आहे, आजअखेर १ लाख ६० हजार रुपये देणे लागते असे सांगितले.

धनादेशाद्वारे पैसे दिले ऑगस्ट २०२३ रोजी कांबळे यांनी धनादेशाद्वारे आणखी २० हजार रुपये शिकलगार यांना धनादेशाद्वारे दिले. त्यावेळी शिकलगार यांनी आणखी १ लाख पाच हजार रुपये देणे लागतो असे करारपत्र करून घेतले. व्याजासह मुद्दल परत करूनही अधिकच्या पैशांसाठी कांबळे यांना शिवीगाळ आणि धमकावण्याचा प्रकार सुरु केला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर कांबळे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून महिला सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अभिजीत देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली