शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

घनकचरा प्रकल्प खासगीकरणाचा डाव उधळला: सांगलीत वर्कआॅर्डर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:45 AM

सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे खासगीकरण व नागरिकांवर टिफीन शुल्कच्या माध्यमातून कराचा बोजा टाकण्याचा प्रशासनाचा डाव मंगळवारच्या महासभेत नगरसेवकांनी हाणून पाडला.

ठळक मुद्देमहापालिका महासभेत प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे; नगरसेवकांचा रेटाटिफीन फी वगळून आराखड्याला मान्यता दिली. प्रत्यक्षात ठरावात मात्र या गोष्टींचा समावेश नाही.

सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे खासगीकरण व नागरिकांवर टिफीन शुल्कच्या माध्यमातून कराचा बोजा टाकण्याचा प्रशासनाचा डाव मंगळवारच्या महासभेत नगरसेवकांनी हाणून पाडला.उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल झाली. अखेर उपायुक्त स्मृती पाटील यांनी इको सेव्ह कंपनीला दिलेली वर्कआॅर्डर रद्द करण्याचे आश्वासन महासभेत दिले.

या विषयावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी आक्रमक होत प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.महापालिकेची महासभा महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मागील सभेत घनकचरा प्रकल्प आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. पण इतिवृत्त कायम करण्यापूर्वीच घनकचरा प्रकल्पाची निविदा काढण्यात आली असून, सल्लागार कंपनी इको सेव्हला वर्कआॅर्डर दिल्याचे नगरसेवक शेखर माने यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले की, घनकचरा आराखड्यातील कालबा' तंत्रज्ञान, कचरा उठावासाठी नागरिकांकडून शुल्क वसूल करणे आणि खासगीकरण या गोष्टीला नगरसेवकांनी विरोध केला होता. जिल्हाधिकाºयांसमवेत झालेल्या बैठकीतही या मुद्द्यावरच चर्चा झाली. त्यानुसार महासभेने खासगीकरण व टिफीन फी वगळून आराखड्याला मान्यता दिली. प्रत्यक्षात ठरावात मात्र या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला नाही.

जिल्हाधिकाºयांसमवेत झालेल्या बैठकीच्या आधीच्या महासभेत ठराव घुसडण्यात आला. त्यात खासगीकरण व श्ुाुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांवर कराचा बोजा पडणार असल्याचे सांगत त्यांनी वर्क आॅर्डरची प्रतच महापौरांकडे सादर केली.

घनकचरा प्रकल्पात प्रशासनाचा मनमानी कारभार उघड होताच सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाले. त्यात इतिवृत्त मंजुरीआधीच ठरावाची अंमलबजावणी कशी केली, असा सवालही माने यांनी उपस्थित केला. त्यावर नगरसचिव के. सी. हळिंगळे यांनी, अशी कायद्यात कोठेही तरतूद नाही. मात्र सभा नियमात याचा उल्लेख व तत्कालीन आयुक्त अजिज कारचे यांनी महासभेचे इतिवृत्त मंजूर झाल्याशिवाय ठरावाची अंमलबजावणी करू नये, असे परिपत्रक काढले असल्याचे स्पष्ट केले. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवक पुन्हा प्रशासनावर तुटून पडले. विष्णू माने, शेडजी मोहिते, संजय मेंढे, गौतम पवार, सुरेश आवटी, संतोष पाटील या सदस्यांनी जाब विचारला. किशोर जामदार यांनी, इतिवृत्त मंजुरीपूर्वी ठरावाची अंमलबजावणी करू नये अशी कायद्यात तरतूद नाही. ठरावाची अंमलबजावणी सुरु झाली असल्यास त्यात बदल करता येत नसल्याचे सांगत, प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

उपायुक्त स्मृती पाटील यांच्या सहीने वर्कआॅर्डर दिल्याने सदस्यांनी त्यांना जाब विचारला. पाटील म्हणाल्या की, हरित न्यायालयाने घनकचरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत नोटीस पाठविली होती. त्यातील मुद्द्यावर खुलासा करताना संबंधित कंपनीला चार ओळीचे पत्र दिले आहे. हे पत्र म्हणजे वर्कआॅर्डर नव्हे. महासभेची इच्छा असेल तर ते रद्द करू. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया महासभेत चर्चा करूनच राबवली जाणार असल्याचे सांगत, त्यांनी सदस्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

अखेर महापौर हारूण शिकलगार यांनी, नागरिकांकडून टिफीन शुल्क वसुली व खासगीकरणाचा प्रस्ताव रद्द करून नवीन तंत्रज्ञानाचा पर्याय स्वीकारत, संबंधित कंपनीला दिलेली वर्कआॅर्डर रद्द करण्याचे आदेश उपायुक्त पाटील यांना दिले.नगरसेवकांत टोलेबाजी

घनकचरा प्रकल्पावर शेखर माने बोलत असतानाच विष्णू माने मध्येच उठले. त्यांनाही या विषयावर बोलायचे होते. पण माने यांनी त्यांना थांबविले. यातून दोघांत खडाजंगी झाली. ‘मला घनकचºयातील जास्त कळते, मीच शहाणा, असे समजू नका’, अशा शब्दात विष्णू माने यांनी टोला लगावला. त्याच्या प्रत्युत्तरात शेखर माने यांनी, ‘हा विषय माझा आहे, त्यावर बोलून भाव खाऊ नका’, असा चिमटा काढला. तसेच किशोर जामदार कायद्यातील तरतूद सांगत असताना विष्णू माने यांनी त्यांना उद्देशून ‘प्रशासनाची सुपारी घेतली आहे का?’ असा सवाल केला. त्यावर जामदार यांनीही, विष्णू माने प्रसारमाध्यमांतून छायाचित्र छापून यावे, यासाठी उभे असल्याचा टोला लगावला.आयुक्तांवर हल्लाबोलघनकचरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीवरून नगरसेवकांनी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यावर हल्लाबोल केला. गौतम पवार म्हणाले की, आयुक्तांबद्दल असंतोष वाढला आहे. त्यामुळे शासनाने त्यांना दिलेली मुदतवाढ रद्द करावी, असा ठराव सभागृहात करावा. राज्यमंत्र्यांनी आदेश देऊनही त्यांनी ड्रेनेज ठेकेदाराचे बिल दिले. आयुक्तांविरोधात सभागृहात मतदान घ्या. आता सभागृहात नगरसेवक तावातावाने बोलत आहेत, पण नंतर त्यांच्याच कार्यालयात जाऊन गोडही बोलतात.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली