शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सांगलीत ‘शरीरसौष्ठव’ची केमिस्ट्री बिघडली

By admin | Updated: December 4, 2014 23:49 IST

खेळाडूंची फरफट : संघटनांमधील सत्तासंघर्ष, वशिलेबाजी, वर्चस्ववादामुळे खेळाला फटका

आदित्यराज घोरपडे -हरिपूर -‘शरीरसौष्ठव’ म्हणजे सांगलीचा श्वास. समांतर संघटनांचे राजकारण, सत्तासंघर्ष, वशिलेबाजी आणि वर्चस्ववादामुळे खेळाडूंची फरफट होत आहे. खेळातील राजकारणास कंटाळून काही खेळाडूंनी खेळास ‘रामराम’ ठोकला, तर काहीजण इतर जिल्ह्यातून खेळण्याच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यातील शरीरसौष्ठवची केमिस्ट्री बिघडल्यानं ‘केमिकल लोचा’ झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्हा बॅकफूटवर फेकला गेला आहे. टॉप टू बॉटम सुपर पोझेस देऊन आपल्या पिळदार शरीरयष्टीनं महाराष्ट्राला भूरळ घालणारे अनेक शरीरसौष्ठवपटू सांगलीच्या मातीनं घडवले. मात्र गेल्या वर्षभरात सांगलीच्या शरीरसौष्ठवची केमिस्ट्रीचं बिघडली. जिल्ह्यात दोन समांतर शरीरसौष्ठव संघटना काम करत आहेत. त्यामुळे खेळाडूंची विभागणी झाली. अर्थात राज्यातही हिच स्थिती आहे. ‘आमचीच संघटना अधिकृत व मान्यताप्राप्त’ असा दावा दोन्ही संघटनांकडून केला जातोय. त्यामुळे खेळाडूंची चांगलीच पंचाईत झाली आहे. सांगलीतील गुणवंत खेळाडू खेळातील राजकारणात भरडले जात आहेत. त्यातीलच एक ‘भगीरथ शाम राठोड’... शरीरसौष्ठवमधील डझनभर मानाच्या किताबाचा मानकरी. सांगलीचा आघाडीचा शरीरसौष्ठवपटू. स्वभाव सडेतोड, मात्र दिलाचा राजा माणूस. दिवसरात्र मेहनत करूनही भगीरथच्या नशिबी उपेक्षाच. शरीरसौष्ठवमध्ये जेवढ्या वेगाने भगीरथचा ‘सेन्सेक्स’ वर गेला तेवढ्याच वेगाने तो खालीही आला. निराश न होता प्रस्थापितांच्या टीका टोमण्यांचे ‘सप्लीमेंट’ पचवत भगीरथ मेहनत करत राहिला. आता तर ‘महाराष्ट्र श्री’ किताबाला गवसणी घालण्याचं बळ भगीरथनं एकवटलं आहे. रस्त्यावर मसाला विकून उदरनिर्वाह करणारी आई आणि बालपणीच हरपलेले पितृछत्र ही भगीरथची ‘फॅमिली बॅगराऊंड’. सर्टिफाईड ट्रेनर आणि स्पोर्टस् जनरल न्युट्रीशियन्स म्हणून काम करून भगीरथ आपली रोजीरोटी कमावतोय. शरीरसौष्ठवला ‘देव’ मानणाऱ्या भगीरथवर ‘देवा तुला शोधू कुठे’ म्हणण्याची वेळ आली आहे. स्पर्धांमधील वशिलेबाजीमुळे जिल्ह्याचा हा गुणी खेळाडू इतर जिल्ह्यांकडून स्पर्धा खेळण्याच्या वाटेवर आहे. ही तर भगीरथची शॉर्ट स्टोरी आहे. असे अनेक भगीरथ सांगलीच्या मातीत लपले आहेत. अन्यायाला कंटाळून काहींनी खेळ सोडला, तर काहीजण खासगी व्यायामशाळेत चार-पाच हजारांवर राबत आहेत. १९९५ नंतर जिल्ह्याला एकदाही ‘महाराष्ट्र श्री’ किताब मिळाला नाही. खेळाडूंची पात्रता असूनही तो का मिळत नाही? की मिळूच दिला जात नाही? याचं शरीरसौष्ठवचे ‘तारणहार’ म्हणवणाऱ्यांना काहीच देणं-घेणं नाही. स्पर्धांचा सर्रास प्रसिध्दीसाठी वापर होत आहे. हीच स्थिती कायम राहिली, तर जिल्ह्यातील शरीरसौष्ठव खेळ संपायला वेळ लागणार नाही. भगीरथनं मिळवलेले किताब...भीमसेन सँण्डो श्री, सांगली श्री, पेठभाग श्री, बालगणेश श्री, आरग सरपंच श्री, बेडग सरपंच श्री, अंबाबाई श्री, बिसूर श्री, भिलवडी श्री, जयहिंद श्री, तारदाळ श्री, इस्लामपूर श्री‘लोकमत’ आयोजित राज्यस्तरीय जवाहरलाल दर्डा श्री स्पर्धा (यवतमाळ) : रौप्यपदकमहाराष्ट्र श्री स्पर्धा (पिंपचरी-चिंचवड) : ७० किलो वजनी गटात कास्यपदकज्युनिअर भारत श्री स्पर्धा, खम्माम (हैदराबाद) : ७० किलोत सुवर्णपदकराष्ट्रीय स्पर्धा, गोकाक (कर्नाटक) : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्वमी खरे बोलतो, सडेतोड बोलतो म्हणूनच मला अनेकांचा रोष ओढावून घ्यावा लागला. दिवसभर डोक्यात फक्त शरीरसौष्ठवच असते. संघटनांमधील वादामुळे खुप नुकसान झाले. डोक्यावर अडीच लाखाचे कर्ज आहे. जो तो स्वत:चा स्वार्थ बघतो. खुप मेहनत करतोय तरीही खेळातील राजकारणामुळे पाय ओढले जातात. पात्रता असूनही स्पर्धेत खेळू शकत नाही. - भगीरथ राठोड , (राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू)