शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

स्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:09 IST

सांगली : शारीरिक क्षमतेची लोखंडासारखी महाकठीण परीक्षा घेणाऱ्या ऑस्ट्रियामधील ह्यआयर्नमॅनह्ण स्पर्धेत बाजी मारत सांगलीच्या स्वप्नील कुंभारकर या खेळाडुने हा ...

ठळक मुद्देस्वप्नील कुंभारकर बनला सांगलीचा पहिला ‘आयर्नमॅन’वादळातही सायकलिंग : ऑस्ट्रियामध्ये पार पडली स्पर्धा

सांगली : शारीरिक क्षमतेची लोखंडासारखी महाकठीण परीक्षा घेणाऱ्या ऑस्ट्रियामधील ह्यआयर्नमॅनह्ण स्पर्धेत बाजी मारत सांगलीच्या स्वप्नील कुंभारकर या खेळाडुने हा किताब पटकाविला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसास तोंड देत त्याने वेळेत आव्हान पूर्ण केले. सांगलीतून असा किताब मिळविणारा कुंभार हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.रविवारी ७ जुलै रोजी युरोपमधील आॅस्ट्रिया देशातील क्लॅगनफर्ट शहरात ही आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ही स्पर्धा पार पडली. स्वप्नील सत्यवान कुंभारकरने ही खडतर स्पर्धा ४१४ तास ५९ मिनिटे ०१ सेकंदात पुर्ण करून, सांगलीतील पहिला आयनमॅन होण्याचा मान मिळवला. आयर्नमॅन हा किताब, ट्रायथॉलोन या विभागात मोडतो.

या स्पर्धेत स्पर्धकास प्रथम ३.८ किलामिटर पोहणे, त्यानंतर १८० किलोमिटर सायकल चालवणे व त्यानंतर ४२.१९८ किमी ऐवढे (फुल-मॅराथोन) अंतर धावणे, हे सर्व सलगपणे १७ तासांच्या आत पुर्ण केल्यावरच, आयर्नमॅन हा किताब मिळतो.ऑस्ट्रियामधील स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी ७ वाजून ४० मिनिटास स्पर्धा सुरु केली व रात्री १०.३९ वाजण्याच्या सुमारास ही स्पर्धा पुर्ण केली. स्वप्नीलने ३.८ किमी पोहण्यास १ तास ४३ मी, १८० किमी सायकलिंग करण्यास ७ तास २८ मिनिटे आणि ४२.१९८ किमी (फुल-मॅराथोन) अंतर धावण्यास ५ तास १६ मी. इतक्या वेळेत स्पर्धा यशस्वीपणे पुर्ण केली. प्रत्येक इव्हेंन्टनंतर कपडे व शूज बदलणे याचा ट्रान्झीशन टाईमसुध्दा या स्पर्धा पुर्ण करण्याच्या वेळेतच पकडला जातो.सुमारे १०० किमी सायकलिंगचा टप्पा पूर्ण झाल्यावर स्पर्धेच्या ठिकाणी मोठे वादळ सुरू झाले व पावसाने स्पर्धा प्रचंड झोडपून काढण्यास सुरूवात केली. अशा खडतर नैसर्गिक आव्हानास सामोरे जात वेळ प्रसंगी सायकल हातात घेवून पळवत नेत त्याने स्पर्धा पूर्ण केली. इतक्या वाऱ्याच्या वेगात सायकल चालवता येणे शक्य नव्हते.

ऊन, वारा, पाऊस यातील कोणतीही गोष्ट स्पर्धा थांबवत नाही. अशा नैसर्गिक अडथळ्यातही वेळेचे मिटर चालूच राहते. नैसर्गिक आव्हानास तोंड देत त्याने ही स्पर्धा पुर्ण केली, अन्यथा स्पर्धा पूर्ण करण्याची वेळे आणखी कमी झाली असती. त्याच्या या यशाने सांगलीतील क्रीडा क्षेत्र भारावून गेले असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनSangliसांगली