शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सांगलीत लिंगायत महामोर्चाचे विराट दर्शन, धर्ममान्यतेसाठी समाज एकवटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 17:59 IST

सांगली : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी रविवारी सांगलीत लिंगायत समाजाने विराट मोर्चा काढला.

सांगली : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी रविवारी सांगलीत लिंगायत समाजाने विराट मोर्चा काढला. या महामोर्चात कर्नाटक, कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील लिंगायत बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. एक लिंगायत... कोटी लिंगायतच्या घोषणांनी सांगली शहर दुमदुमले होते. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.डोईवर भगवे फेटे, टोप्या आणि हाती भगवे ध्वज घेऊन लिंगायत समाजबांधव सांगलीतील विश्रामबाग चौकात एकवटले. सकाळपासूनच विश्रामबाग चौकात लिंगायत समाजबांधवांचे जथेच्या जथे जिल्ह्याच्या कानाकोप-यातून येत होते. विश्रामबाग चौकात बसव पीठ तयार करण्यात आले होते. सकाळी साडेदहा वाजल्यापासून विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचे बसव पीठावर आगमन झाले. प. पू. डॉ. बसवलिंग पट्टदेवरू, प. पू. कोरणेश्वर, रुद्रपशुपती कोळेकर महाराज, चन्नबसवानंद स्वामीजी, सद्गुरु बसवप्रभू स्वामीजी यांच्या उपस्थितीत भगवा ध्वज फडकवून महामोर्चाला प्रारंभ झाला.यावेळी लिंगायत धर्म, स्वतंत्र धर्म, आम्ही लिंगायत, धर्म लिंगायत अशा घोषणांनी विश्रामबाग चौक दणाणून गेला होता. संपूर्ण विश्रामबाग चौक, सांगली-मिरज रस्ता खचाखच भरला होता. डॉ. शिवानंद शिवाचार्य यांनी समाजबांधवांना आशीर्वचन दिले. त्यानंतर विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात आला.मोर्चाच्या मार्गावर दुतर्फा स्वयंसेवकांनी साखळी केली होती. मुस्लिम समाज, बहुजन मुक्ती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह विविध संघटनांनी रस्त्यावर नाष्टा, पाण्याचे स्टॉल लावले होते. समन्वय समितीच्यावतीनेही नाष्टा व पाण्याची व्यवस्था केली होती. दुपारी दोन वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तिथे शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिका-यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता झाली.मोर्चेक-यांच्या मागण्यालिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी, लिंगायतधर्मीयांना धार्मिक अल्पसंख्याक वर्गामध्ये समाविष्ट करावे, राष्ट्रीय व राज्यपातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, २०२१ मध्ये होणा-या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वतंत्र नोंद होण्यासाठी सरकारने लोकसंख्या पारपत्रामध्ये विशिष्ट स्वरुपात नोंदीची व्यवस्था करावी, लिंगायत धर्माच्या मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्याला मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी शासनाने स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी.लिंगायत धर्मावर राज्यकर्त्यांकडून अन्याय : डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजस्वातंत्र्यपूर्व कालखंडात लिंगायत धर्माची जनगणनेमध्ये स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करण्यात आल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. लिंगायत हा एक अवैदिक धर्म असून त्यातील आचरण पद्धती, तात्त्विकी बैठक, परंपरा या हिंदू धर्मापेक्षा पूर्णत: भिन्न आहेत. त्यामुळे लिंगायत हा स्वतंत्र धर्म सिद्ध होतो. स्वतंत्र भारतामध्ये लिंगायत धर्माला संवैधानिक दर्जा न देऊन केंद्र सरकारने समाजबांधवावर अन्याय केला आहे. अल्पसंख्याक असणारा लिंगायत समुदाय शासकीय लाभापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे लिंगायत धर्माला संवैधानिक दर्जा देण्यासाठी भारत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी आशीर्वचनात केली.मुंबईत दहा लाखांचा मोर्चा काढणारलिंगायत समाजाच्यावतीने विविध मागण्यासाठी नांदेड, लातूर आणि आता सांगलीत महामोर्चा झाला. येत्या २८ जानेवारी रोजी यवतमाळ येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे, सोलापूर या जिल्ह्यातही मोर्चे काढण्यात येणार आहे. मुंबईत दहा लाख समाजबांधवांचा मोर्चा काढून शासनाला जाग आणणार असल्याचे अविनाश भोसीकर यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली