शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नोबेलच्या यशामध्ये रेठरेहरणाक्षच्या सुपुत्राचे योगदान--संदीप कलेढोणकर यांच्या जिद्दीला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 19:13 IST

इस्लामपूर : ‘क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ या संशोधनासाठी जॅक्स दुबोशे, जोआखीम फ्रँक व रिचर्ड हेंडरसन या तिघा शास्त्रज्ञांच्या चमूला यावर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

ठळक मुद्देक्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी तंत्र विषाणूंचा हल्ला नेमका कसा होतो याचे प्रत्यक्ष चित्रण क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी या तंत्राने पाहणे शक्यपुणे विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी मिळविल्यावर अमेरिकेतील ओक्लाहोम विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पदवी

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : ‘क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी’ या संशोधनासाठी जॅक्स दुबोशे, जोआखीम फ्रँक व रिचर्ड हेंडरसन या तिघा शास्त्रज्ञांच्या चमूला यावर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील जोआखीम फ्रँक यांना संशोधनात सहकार्य करणाºया १४ जणांच्या गटात वाळवा तालुक्याच्या रेठरेहरणाक्षमधील डॉ. संदीप कलेढोणकर या शास्त्रज्ञाचा समावेश होता. नोबेलच्या यशामध्ये तालुक्याच्या शास्त्रज्ञ सुपुत्राचा हातभार लागल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

स्वीडन येथील स्टॉकहोममध्ये १२ डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात डॉ. जोआखीम फ्रँक यांच्यासमवेत डॉ. संदीप कलेढोणकर उपस्थित राहणार आहेत. जागतिक कीर्तीचा नोबेल पुरस्कार मिळविणाºया संशोधकांच्या चमूत शास्त्रज्ञ म्हणून कार्य करण्याचा बहुमान रेठरेहरणाक्षसारख्या खेड्यातील तरुणाला लाभला.

विषाणू किंवा तत्सम सूक्ष्म अशा जैव रासायनिक पदार्थांचे आहे त्या स्थितीत निरीक्षण करण्याचे तंत्र विकसित झाल्यावर बायोकेमिस्ट्री क्षेत्रात क्रांती घडली. आता त्यापुढे जाऊन जिवंत स्थितीतील जैव रासायनिक रेणूंचे निरीक्षण रंगीत व त्रिमिती अवस्थेतही करणे शक्य झाले आहे. जैव रासायनिक प्रक्रिया बिघडल्यावरच शारीरिक व्याधी जडतात. मानवी शरीरातील व्याधींच्या या कारणांचा अभ्यास करणे, जैव रासायनिक रेणूंचे निरीक्षण करणे, तसेच विषाणूंचा हल्ला नेमका कसा होतो याचे प्रत्यक्ष चित्रण क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी या तंत्राने पाहणे शक्य झाले आहे.

या तंत्रामुळे भविष्यात कर्करोग, अल्झायमर यासारख्या व्याधींवर औषध निर्मिती करणेही सुलभ होणार आहे. उणे १५0 अंश सेल्सिअस तापमानाला रेणू गोठवून त्याचे निरीक्षण करण्याचे तंत्र विकसित करण्याचे अद्भूत कार्य जोआखीम फ्रँक व त्यांच्या सहकारी शास्त्रज्ञांनी केले आहे. हे संशोधन मानवाच्या सुखावह शरीरस्वास्थ्यासाठी मोठे वरदान ठरणार आहे. त्यांच्या या संशोधन कार्यात डॉ. संदीप कलेढोणकर यांनी योगदान दिले आहे.डॉ. संदीप हे प्रा. लक्ष्मण कलेढोणकर यांचे पुत्र होत. त्यांचे शालेय शिक्षण इस्लामपूरच्या आदर्श बालक मंदिरात व पलूसच्या नवोदय विद्यालयात झाले. पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. पदवी मिळविल्यावर अमेरिकेतील ओक्लाहोम विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली. ते सध्या न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात शास्त्रज्ञ आहेत. 

रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील शास्त्रज्ञ डॉ. संदीप कलेढोणकर (डावीकडील) नोबेल विजेते शास्त्रज्ञ जोआखीम फ्रँक यांच्यासमवेत.