शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

पाण्यावर तासनतास तरंगतोय सांगलीतील मोरेवाडीचा अवलिया; वाहत्या, स्थिर पाण्यात तरंगण्याचे कसब

By श्रीनिवास नागे | Updated: May 11, 2023 15:47 IST

परिसरात चर्चेचा विषय

पुनवत (जि. सांगली) : कला कधी माणसाच्या जगण्याचे साधन बनते, तर कधी त्याला प्रकाशझोतात आणत असते. मोरेवाडी (ता. शिराळा) येथील संदीप डिगे यांनी पाण्यावर तरंगण्याची आगळीवेगळी कला प्राप्त केली आहे. लोक पोहताना हातपाय हलवतात; पण संदीप डिगे हातपाय न हलवता तासनतास पाण्यावर तरंगतात. त्यामुळे ते परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत.चिंचोलीजवळच्या मोरेवाडी येथील ३९ वर्षांचे संदीप मारुती डिगे मुंबईतील कंपनीत यंत्रचालक म्हणून काम करतात. पोहणे हा त्यांचा आवडता छंद आहे. वयाच्या सहाव्या वर्षी ते पोहायला शिकले. वेगवेगळ्या पद्धतीने कसे पोहता येईल, यासाठी त्यांनी मुद्दाम प्रयत्न केले. त्यातूनच त्यांना हातपाय न हलवता पाण्यावर जास्तीत जास्त काळ तरंगण्याची कला अवगत झाली.  गावी आल्यावर ते नदी, विहीर, वारणा कालव्यात पोहायला जातात. पाण्यात उतरले की पाण्यावर वरच्या दिशेला तोंड करून हात बाजूला घेऊन कोणतीही हालचाल न करता ते तासनतास तरंगतात. वाहत्या व स्थिर पाण्यात तरंगण्याचे कसब ते दाखवतात. बघणाऱ्यांना त्यांच्या या कलेचे कौतुक वाटते. 

पोहताना जास्तीत जास्त पाठीवर पोहोण्याचा सराव केल्याने पाण्यावर तरंगण्याची कला अवगत झाली. न थकता कितीही काळ पाण्यावर तरंगू शकतो. नियमित सराव हेच यामागचे कारण आहे. - संदीप डिगे

टॅग्स :SangliसांगलीSwimmingपोहणे