शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करांची वाहने पेटवून देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:19 IST

वाळू तस्करांनो आमच्या गावात येऊ नका. आलात तर तुमची वाहने पेटवून देऊ, असा जाहीर इशारा खांजोडवाडी (ता. आटपाडी) येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी दिला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनालाही न भिणाऱ्या वाळू तस्कारांचे धाबे, वाहने पेटविण्याच्या इशाऱ्याने दणाणले आहे.

ठळक मुद्देवाळू तस्करांची वाहने पेटवून देणार!भ्रष्ट शासकीय यंत्रणेविरूध्द तालुक्यात संतापाची लाट

अविनाश बाडआटपाडी : वाळू तस्करांनो आमच्या गावात येऊ नका. आलात तर तुमची वाहने पेटवून देऊ, असा जाहीर इशारा खांजोडवाडी (ता. आटपाडी) येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी दिला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनालाही न भिणाऱ्या वाळू तस्कारांचे धाबे, वाहने पेटविण्याच्या इशाऱ्याने दणाणले आहे.खांजोडवाडी येथील माणगंगा नदीच्या पात्रातून वाळू तस्करी करताना दि. ६ फेब्रुवारी २0१९ रोजी बापू विष्णू सूर्यवंशी यांचा ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडला होता. हा ट्रॅक्टर बदलून दिल्याप्रकरणी पोलिसांनी नायब तहसीलदार बाळासाहेब महादेव सवदे, तलाठी संघटनेचा तालुकाध्यक्ष बजरंग जयवंत लांडगे आणि गोदामपाल भारत लालाप्पा बल्लारी यांच्यावर, चोरीस साहाय्य केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाने वाळू तस्करांबरोबरच भ्रष्ट शासकीय यंत्रणेविरूध्द तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.ज्या खांजोडवाडीतील वाळू तस्करांमुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आले, त्या गावात शुक्रवारी दुपारी ग्रामस्थांनी बैठक घेतली. बैठकीत गावाच्या परिसरातील माणगंगा नदीच्या पात्रातून होत असलेल्या बेसुमार वाळू तस्करीबद्दल संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.

वाळू तस्करांच्या आलिशान मोटारीतून महसूल विभागाचे आणि पोलीस कर्मचारी फिरत आहेत. शिवाय ते कसा पाहुणचार घेतात, कुठे, कुठे पार्टी करतात, आणि कसे संरक्षण करतात, यांची चर्चा झाली. तक्रार देणाऱ्याचे नाव प्रशासनातील काही अधिकारी वाळू तस्करांना लगेच सांगतात. कारवाई करण्याऐवजी काय करतात, याचे किस्से ग्रामस्थांनी सांगितले.पुणे विभागाचे आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना लगेच निवेदन देण्याचा निर्णय झाला. नदीच्या पात्रातील एक हजार ब्रास वाळूचा उपसा करण्यात आला असून, महसूल प्रशासन वाळू तस्करांना मदत करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यापुढे वाळू तस्कर नदीच्या पात्रात वाळू नेण्यासाठी आला की लगेच त्याचे वाहन पेटवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी सरपंच रामदास सूर्यवंशी, माजी सरपंच दादासाहेब सूर्यवंशी, शंकर सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, तुकाराम सूर्यवंशी, शहाजी सूर्यवंशी, बापूराव सूर्यवंशी, विश्वंभर सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, मारूती सूर्यवंशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :sandवाळूSangliसांगली