शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: आटपाडी तालुक्यात खुलेआम वाळू तस्करी, महसूलकडून मिळतेय अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 17:07 IST

पुरावे देवूनही कोणतीच कारवाई केली जात नाही

आटपाडी : आटपाडी तालुक्यामध्ये खुलेआम वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून आटपाडीच्या शुक ओढा पात्राची वाळू तस्करांनी चाळण केली आहे. महसूल विभागाच्या कृपाशीर्वादानेच वाळू तस्करी फोफावली आहे. काही वाळू तस्करांना मिळणारे अभय चर्चेचा विषय ठरला असून सांगली व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून राजरोसपणे वाळू तस्करी होत आहे.काही महिन्यांपासून वाळू तस्करी कमी होताना दिसत होती. मात्र काही ठरावीक महाबहाद्दर तस्करांनी महसूलच्या आशीर्वादाने डोके वर काढले आहे. आटपाडीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शुक ओढा पात्राशेजारी असणाऱ्या लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीलगत मागील दोन दिवसांपासून मोठमोठे खड्डे खणून वाळू तस्करी केली आहे.विस्तीर्ण ओढा पात्र वाळू तस्करांनी अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. शुक ओढ्यामध्ये असणारी शेकडो झाडे वाळू तस्करीने उन्मळून पडली आहेत. शुक ओढा पात्रात भरणाऱ्या आठवडी बाजार परिसर, बाजार समितीकडे जाणाऱ्या पुलाशेजारील असणारा स्मशानभूमी परिसर, अंबाबाई मंदिर परिसर, श्रीराम मंदिर व अंगणवाडी परिसर या ठिकाणी अनेक खड्डे पाडून ओढा पात्राची चाळण केली आहे. याबाबत महसूल प्रशासन काय करत आहे, असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे.महसूल प्रशासनाने वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून रात्रपाळीमध्ये गस्त घातली जाते. मात्र तरीही वाळू तस्करी होत आहे. या मागे नेमके कोणते अर्थकारण काम करत आहे काय, असा सवाल विचारला जात आहे.

अवैध वाळू साठाआटपाडी तालुक्यापासून काही अंतरावर असणाऱ्या सांगली-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर महसूलच्याच आशीर्वादाने वाळू उपसा जोमात सुरू आहे. राजरोसपणे तेथून वाळू उपसा करून तो आटपाडी तालुक्याच्या व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर आणून त्याचा साठा केला जात आहे.

पुरावे देऊनही कारवाईकडे दुर्लक्षआटपाडी शहरामध्ये अवैध वाळू साठवण केले जात असल्याचे पुरावे तलाठी यांना पाठवूनही त्याबाबत कोणतीच कारवाई केली जात नाही. मग अवैध वाळू तस्करी व साठवणूक करणाऱ्यांना अभय कोणाचे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :SangliसांगलीsandवाळूSmugglingतस्करी