मटकासह दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:52+5:302021-02-05T07:29:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील मटका, जुगार, बेकायदा दारू विक्रीसह अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित ...

मटकासह दारू विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील मटका, जुगार, बेकायदा दारू विक्रीसह अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहे. त्यानुसार रविवारी दिवसभरात मटकासह दारू विक्रीच्या तीन कारवाई करण्यात आल्या असून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिंबर एरिया येथे जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. गणपती सिकंदर खंदारे (वय. ३२, रा. टिंबर एरिया) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
कडेगाव तालुक्यात दोन ठिकाणी बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. विहापूर येथे सुलभा कृष्णांत माने (वय ३८) या महिलेस अटक करण्यात आली असून तिच्याकडून ५ हजार ६६८ रूपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच कडेपूर येथे तानाजी बापू तुपे याच्याकडून ८८४ रूपयांची दारू जप्त करण्यात आली. दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यानुसार कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.