अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:55+5:302021-05-09T04:27:55+5:30
सांगली : कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तरीही अनेकजण त्यातूनही अवैध धंदे करत ...

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची विक्री
सांगली : कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तरीही अनेकजण त्यातूनही अवैध धंदे करत असल्याचे समोर आले असून अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा विक्री करणाऱ्या तरुणावर शनिवारी पोलिसांनी कारवाई केली.
लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांकडून संपूर्ण शहरात गस्त सुरू करण्यात आली आहे. त्यातही वर्दळीच्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त तैनात असतो. तरीही त्यातून पळवाट शोधली जात आहे. शनिवारी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ पोलिसांनी एका तरुणाकडून गुटख्याचा साठा जप्त केला. विशेष म्हणजे, हा तरुण ‘अत्यावश्यक सेवा’चा पास लावून होम डिलीव्हरीसाठी थांबला होता. पोलिसांच्या चौकशीत त्यास समाधानकारक उत्तर देता आले नाही, त्यामुळे त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.