शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मायबाप सरकार..! आमचा पगार कधी होणार?, एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारला सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 15:58 IST

आठ ते बारा तास काम करूनही वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे अधिकारी, कर्मचारी नाराज

सांगली : जिल्ह्यातील एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर २०२२ या महिन्यातील पगारासाठी ८ कोटी ५० लाख रुपयांची गरज आहे. शासनाकडून निधीच मिळाला नसल्यामुळे चार हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पगारच झाले नाहीत. यामुळे मायबाप राज्य सरकार..! आमचा पगार कधी होणार, असा सवाल एसटी कर्मचारी करू लागले आहेत.जिल्ह्यातील दहा आगारांतील एसटीची प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत चालू आहे. चांगले उत्पन्न मिळत असूनही डिझेलचे वाढते दर, जुन्या बसेसची देखभाल दुरुस्तीमध्येच बहुतांशी निधी खर्च होत आहे. यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी शिल्लक राहत नाही. यामुळे एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना पगारासाठी राज्य शासनाच्या निधीचीच गरज आहे. दर महिन्याच्या ७ तारखेला एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार नेहमी होत होते; पण गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. आठ ते बारा तास काम करूनही वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे अधिकारी, कर्मचारी नाराज आहेत. त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.

यामुळे एसटी महामंडळातील कर्मचारी मायबाप सरकार..! आमचा पगार कधी मिळणार, असा सवाल राज्य शासनाकडे करत आहेत. जानेवारी २०२३ चे ११ तारीख आली तरीही डिसेंबर २०२२ मधीलच पगार मिळाला नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये : अशोक खोतएसटी कर्मचारी कुटुंबाचा विचार न करता प्रवाशांची सेवा करत आहेत. ग्रामीण भागामध्ये एसटी हीच प्रमुख प्रवासाचे साधन आहे. यामुळे राज्य शासनाने नफा-तोट्याचा विचार न करता एसटी वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले पाहिजेत. यासाठी शासनाने वेळेवर निधी देण्याची गरज आहे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकार