शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील साडेपाच हजार गुरुजी पगारासाठी वेटिंगवर, गरज ५० कोटींची मिळाले १५ कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:42 IST

बँकेच्या हप्त्यासह इतर खर्चासाठी दुसऱ्यांकडे उसने पैसे मागण्याची वेळ

सांगली : जिल्ह्यातील शिक्षकांच्या पगारासाठी महिन्याला सुमारे ५० कोटी रुपये निधीची गरज असताना शासनाकडून जिल्हा परिषदेला केवळ १५ कोटी रुपये मिळाले आहेत. या निधीतून जत, आटपाडी तालुक्यांचे डिसेंबर महिन्याचेच पगार होणार आहेत. जानेवारी महिन्याच्या पगारासाठी जिल्ह्यातील पाच हजार ५०० प्राथमिक शिक्षकांना पगारासाठी वेटिंगवर थांबावे लागणार आहे.गेल्या चार महिन्यांपासून शिक्षकांच्या पगाराची परवड चालू आहे. प्रत्येक महिन्यात किमान दोन तालुक्यांना पगारासाठी पुढील महिन्याची वाट पाहावी लागते. पुरेसा निधी येत नसल्याने आलटून-पालटून दोन तालुके पगारासाठी प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सुमारे पाच हजार ५०० शिक्षकांच्या जानेवारीच्या पगारासाठी सुमारे ५० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे; मात्र सध्या जिल्हा परिषदेकडे १५ कोटी रुपये शिल्लक आहेत. या निधीतून केवळ दोन तालुक्यातील शिक्षकांचे पगार होणार आहेत. त्यामुळे आठ तालुक्यातील शिक्षकांना पगारासाठी वाट बघावी लागणार आहे. शासनाकडून निधी आल्यानंतरच आठ तालुक्यांतील शिक्षकांचे पगार होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वेळेत पगार होत नसल्याने शिक्षकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. बँकेच्या हप्त्यासह इतर खर्चासाठी दुसऱ्यांकडे उसने पैसे मागण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.जिल्ह्यातील अनेक शिक्षकांच्या वैद्यकीय बिलाचे पैसे शासनाकडून मिळाले नाहीत. यामुळे अनेकांची बिले प्रलंबित आहेत. काही शिक्षकांनी पगाराचे वेतन वैद्यकीय बिलासाठी खर्च केल्यामुळे अनेकांना आर्थिक चणचण भासत आहे.

उशिरा पगारामुळे बँकांचे हप्ते थकीत : महेश शरनाथेगेल्या सहा महिन्यांपासून शिक्षकांचे पगार उशिरा होत आहेत. यामुळे शिक्षकांची आर्थिक कोंडी होत असून कर्जाचे बँकांचे हप्ते थांबल्यामुळे त्यांच्याकडून दंड आकारणी सुरु झाली आहे. कौटुंबिक खर्चासाठी उसनवारी करावी लागत आहे. शासनाने शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे आणि दिगंबर सावंत यांनी केली आहे.

शासनाकडून मिळालेल्या निधीतून जत, आटपाडी तालुक्यातील शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे पगार करणार आहे. जानेवारी महिन्यातील शिक्षकांच्या पगारासाठी शासनाकडून निधी कमी आल्यामुळे पगार लांबणार आहे. निधीची मागणी केली असून तो लवकर मिळेल, अशी अपेक्षा आहे. -मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षक