शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे पोलिसांचा साडेसात कोटींचा वेतन फरक अडकला, दप्तर दिरंगाईचा फटका 

By अविनाश कोळी | Updated: September 26, 2022 20:00 IST

सांगली जिल्ह्यातील पाचशे पोलिसांचा साडेसात कोटींचा वेतन फरक अडकला. 

सांगली : सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना तातडीने देण्याचे शासन आदेश असतानाही सुमारे ५०० पोलिसांचे साडेसात कोटी रुपये लालफितीच्या कारभारामुळे अडकले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवरच अन्याय होत असल्याने त्यांनी आता दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी एक आदेश काढला आहे. यामध्ये त्यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या १ जानेवारी २००६ ते ३१ मार्च २००९ या कालावधीतील वेतन फरकाची थकबाकी तातडीने देण्याची सूचना केली आहे. 

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेच्या स्तर-२ मध्ये जमा केलेल्या रकमेचा परतावा मार्च २०२२ पर्यंत करण्याचे आदेश शासनाने दिले होते. आदेशानुसार राज्यभर विविध शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा परतावा मिळाला, मात्र सांगली जिल्ह्यातील तब्बल ५०० पोलिसांना या ना त्या कारणाने फरकाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दररोज अनेक पोलीस कोषागार कार्यालयाचे उंबरठे झिजवीत आहेत. कागदोपत्री त्रुटी दाखवून पोलिसांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे काम सध्या सुरू आहे. पोलिसांच्या हाताशी आलेला घास दप्तर दिरंगाईने तोंडापर्यंत येत नसल्याचे चित्र आहे. फरकाची ही रक्कम भरती झालेल्या वर्षानुसार कमी-जास्त आहे.

पोलीसप्रमुखांकडून कर्मचाऱ्यांना अपेक्षाफरकापासून वंचित काही पोलीस याबाबत जिल्हा पोलीसप्रमुखांकडे दाद मागणार असल्याचे समजते. पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी पोलिसांना त्यांचे हक्काचे लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वारस नोंदीपासून अनेक स्तुत्य प्रशासकीय बदल त्यांनी केले. त्यामुळे या प्रकरणात त्यांनी लक्ष घातले तर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित होऊ शकतो.

अन्य जिल्ह्यात मिळाले, सांगलीला का नाही?शासनाने दिलेल्या ३१ मार्च २०२२ या मुदतीत औरंगाबाद, मुंबई, उल्हासनगर आयुक्तालय, बुलडाणा आदी अनेक जिल्ह्यांमधील पोलिसांना फरक मिळाला असताना केवळ सांगलीच्याच पोलिसांची अडवणूक का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस