महापालिका ठेकेदारांचे बिलासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:26+5:302021-01-14T04:21:26+5:30

सांगली : महापालिकेच्या ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. ही बिले तातडीने अदा करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी ...

Sakade for municipal contractor's bill | महापालिका ठेकेदारांचे बिलासाठी साकडे

महापालिका ठेकेदारांचे बिलासाठी साकडे

सांगली : महापालिकेच्या ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. ही बिले तातडीने अदा करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी ठेकेदार संघटनेच्यावतीने पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली.

महापालिका मक्तेदार असोसिएशनचे अध्यक्ष सुरज काटे, साजिद शेख, अजित जाधव, दिनेश शिंदे, जाफर रंगारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. महापालिकेकडे जवळपास ३० कोटी रुपयांची थकीत बिले आहेत. ही बिले वेळवर न मिळाल्याने ठेकेदार आर्थिक संकटात सापडला आहे. शासकीय निधीतील कामांची बिले अदा केली जात नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला बिले देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी डी. एस. पवार, मुस्तफा तांबोळी, विशाल कांबळे, सागर कोळेकर, फिरोज जमादार, आशिष वाघमारे, ओंकार पवार, अक्षय दोडमनी, अमित गडदे, अनिल पाटील, सचिन कदम, हर्षद पडळकर, धनंजय रुपनर उपस्थित होते.

Web Title: Sakade for municipal contractor's bill