आष्ट्यात शाकंभरी महोत्सव उद्यापासून
By Admin | Updated: December 26, 2014 23:53 IST2014-12-26T22:11:03+5:302014-12-26T23:53:44+5:30
जय्यत तयारी : चौंडेश्वरी देवीच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

आष्ट्यात शाकंभरी महोत्सव उद्यापासून
आष्टा : येथील श्री चौंडेश्वरी देवीचा श्री शाकंभरी नवरात्र महोत्सव रविवार दि. २८ ते सोमवार दि. ५ जानेवारीअखेर होत आहे. नवचंडी होम श्री शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ यासह विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची शहरात तयारी करण्यात येत आहे.
आष्टा नगरीची ग्रामदेवता श्री चौंडेश्वरी माता एक जागृत देवस्थान आहे. ग्रामदेवता चौंडेश्वरीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. रविवार दि. २८ ते सोमवार दि. ५ जानेवारीअखेर दररोज पहाटे ४ ते ६ आदिशक्ती श्री चौंडेश्वरी देवीस महाभिषेक, पहाटे ६ ते ७ देवी मंत्राचा सामुदायिक जप, सकाळी ७ ते ९ श्री दुर्गा सप्तशती पाठ, दररोज सकाळी व रात्री ७.३0 वाजता छबिना, आरती, दुपारी १ ते ३ नामांकित भजनी मंडळाचा कार्यक्रम.
रविवार दि. २८ रोजी दुपारी ४ वाजता श्री शिवपुराण ग्रंथ शोभायात्रा. सोमवार दि. २९ ते रविवार दि. ४ जानेवारीअखेर दररोज सकाळी ९.३0 ते १२ व दुपारी ४ ते ७ श्री क्षेत्र आळंदी येथील वेदमूर्ती अनंतशास्त्री मुळे (गोंदीकर) यांच्या अमृतवाणीत श्री शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ होणार आहे.
सोमवार दि. २९ रोजी रात्री ८.३0 वाजता बाल भावं सरीता वाद्यवृंदाचा कार्यक्रम होईल. मंगळवार दि. ३0 रोजी अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान, बुधवार दि. ३१ रोजी नाट्य, सिने कलाकार दिलीप हल्याळ व सारेगमप फेम मृदुला मोघे यांचा हास्य षटकार, गुरुवार दि. १ जानेवारी रोजी सुनेत्राताई पवार कलामंच बारामती यांचे धमाल विनोदी पथनाट्य, शुक्रवार दि. २ रोजी सौ. दीपाली केळकर यांचे हास्यसंजीवनी, शनिवार दि. ३ रोजी अशोक व भिकू गोंधळी पेठ यांचा गोंधळाचा कार्यक्रम, रविवार दि. ४ रोजी विजय जाधव यांचे ग्रामीण विनोदी कथाकथन.
सोमवार दि. ५ रोजी पहाटे ५ ते ११ नवचंडी होम व पूर्णाहूती, सकाळी ९ वाजता सहस्त्रकुमारी पूजन, सकाळी १0 वाजता सहस्र सौ. भाग्यवती पूजन व प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)