सागावात कडकडीत बंद सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:15+5:302021-05-22T04:25:15+5:30
पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथे कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आठ दिवस ...

सागावात कडकडीत बंद सुरू
पुनवत : सागाव (ता. शिराळा) येथे कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आठ दिवस गाव पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे. गावात शुक्रवारी मार्शल कमांडो व पोलीस पथक दाखल झाले. त्यामुळे दिवसभर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.
सागावला शुक्रवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. गावातील सर्व व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बेशिस्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांसह सहा मार्शल कमांडोचे पथक तैनात करण्यात आले आहे. प्रशासनाच्या कारवाईचा धसका नागरिकांनी घेतल्याने पहिल्याच दिवशी गावात दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला. मार्शल फोर्स टीमचे अध्यक्ष सोमनाथ यमगर, उपाध्यक्षा प्रगती यमगर, अनिकेत जोगदांडे, ओंकार पाटील, सदस्य अर्जुन सातवेकर यांच्या नियंत्रणामध्ये सहा कमांडो गावात सलग आठ दिवस गस्त घालणार आहेत. या टीमला ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच सामाजिक कार्यकर्ते सचिन लोले, विनायक पाटील, विशाल संकपाळ, राजू माने, रोहित आसवले, अजित शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी पांडुरंग पाटील, आनंदा आपटे, दीपक जाधव यांचे सहकार्य लाभत आहे.
फोटो ओळ- २२ सागाव -कोरोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी सागाव येथे बंदोबस्तासाठी दाखल झालेली मार्शल फोर्स व पोलीस प्रशासनाची टीम.