आटपाडी : राजेवाडी (ता. मिरज) येथील श्री.श्री. सद्गुरू साखर कारखान्यात मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अनोळखी १० ते १५ जणांच्या जमावाने तोडफोड करत मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना घडली आहे.याबाबत महादेव वसंत बोडरे (वय ५२, रा. अधिकारी कॉलनी, श्री.श्री. साखर कारखाना राजेवाडी, मूळ रा. निमगाव मगर, ता. माळशिरस) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्रीच्या वेळी अनोळखी जमावाने कारखान्याच्या परिसरात घुसून डीएस कंट्रोल रूम, वे-ब्रिज ऑफिस, टाइम ऑफिस, सर्व्हर रूम, सिक्युरिटी गेट ऑफिस आणि शेतकी विभागातील इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर, खिडक्या-दरवाजांची तोडफोड केली. या तोडफोडीत कारखान्याचे अंदाजे ४५ ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी फिर्यादीसह सुरक्षा रक्षक बापू केंगार आणि कुंडलिक बोडरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणही करण्यात आली. या घटनेनंतर कारखाना परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अनोळखी १० ते १५ इसमांविरुद्ध बीएनएस कलम ३३३, ३५२, ३५१(२), ३२४(५), १८९(२), १९०, १९१(३) तसेच मुंबई पोलिस अधिनियम कलम १३५ व फौजदारी सुधारणा कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास आटपाडी पोलिस करत आहेत.
Web Summary : A mob vandalized the Shree Sadguru Sugar Factory in Rajewadi, Sangli, causing approximately ₹45-50 lakh in damages. Security guards were assaulted. Police have registered a case against 10-15 unidentified individuals and are investigating the incident.
Web Summary : सांगली के राजेवाड़ी में श्री सद्गुरु चीनी मिल में अज्ञात लोगों ने तोड़फोड़ की, जिससे लगभग ₹45-50 लाख का नुकसान हुआ। सुरक्षा गार्डों पर हमला किया गया। पुलिस ने 10-15 अज्ञात व्यक्तियों के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।