शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

शिक्षक बँक अध्यक्षपदी सदाशिव पाटील

By admin | Published: January 19, 2017 11:22 PM

चुरशीची लढत : संघाचे शामगोंड पाटील यांचा पराभव; समितीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी सत्ताधारी गटाचे सदाशिव आनंदराव पाटील यांची गुरुवारी निवड झाली. पाटील यांनी विरोधी शिक्षक संघाचे उमेदवार शामगोंड पाटील यांचा १३ विरूद्ध आठ मतांनी पराभव केला. या निवडीनंतर शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. शिक्षक बँकेचे अध्यक्ष यु. टी. जाधव यांनी राजीनामा दिल्याने नव्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी शिक्षक समितीत चुरस होती. त्यात समितीच्या संचालकांवर गुन्हे दाखल झाल्याने, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात अध्यक्ष निवडीची बैठक कोरमअभावी रद्द करण्यात आली होती. गुरुवारी अध्यक्ष निवडीसाठी संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. गत बैठकीप्रमाणे ही बैठक पण होणार की नाही, असा संभ्रमही निर्माण झाला होता. पण अखेर अध्यक्ष निवडीला सत्ताधारी गटाचे सर्व तेरा संचालक उपस्थित राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी ए. व्ही. गराडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची बैठक झाली. यावेळी अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी समितीतून सदाशिव पाटील (पाडळी, ता. शिराळा) यांनी, तर विरोधी गटातून शामगोंड पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सदाशिवराव पाटील यांना १३, तर शामगोंड पाटील यांना ८ मते मिळाली. निवडीनंतर समितीच्या संचालक व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. शिक्षक समितीचे राज्यनेते विश्वनाथ मिरजकर, राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हा नेते किसनराव पाटील, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड, शशिकांत भागवत यांनी नूतन अध्यक्ष पाटील यांचा सत्कार केला. यावेळी मिरजकर म्हणाले की, बँकेतील विरोधक बिथरले आहेत. त्यांचे वैचारिक संतुलन बिघडले आहे. शिक्षक संघाला शिवाजीराव पाटील यांच्यासारखा नेता पुन्हा मिळणार नाही. सध्याच्या संघाला नेताच उरलेला नाही. खालच्या पातळीवर जाऊन संघाकडून राजकारण केले जात आहे. मृत सभासदाच्या नावावर कुभांड रचून राजकारण सुरू आहे. अशा मंडळींना शिक्षक सभासद कधीही थारा देणार नाहीत. ते कधीही नेतृत्व करू शकणार नाहीत. त्यांच्या कर्तृत्वानेच आम्हाला सभासद पुढील वीस वर्षे बँकेची सत्ता देतील. विरोधकांच्या आरोपांमुळे सभासदांचा बँकेवरील विश्वास कमी झालेला नाही. ठेवीत वाढ होत आहे. भविष्यात कुभांड रचणाऱ्या विरोधकांना तुरूंगाची हवा खावी लागेल. किरण गायकवाड म्हणाले की, माजी अध्यक्ष यु. टी. जाधव यांनी चांगले काम केले. बँकेची वाटचाल कॅशलेस व्यवहाराकडे सुरू आहे. त्यांच्या नव्या संकल्पना यापुढेही बँकेत राबविल्या जातील. यावेळी यु. टी. जाधव, शशिकांत बजबळे, अंजली कमाने उपस्थित होते (प्रतिनिधी)