शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस मुलाखतीसाठी सदाभाऊ, सत्यजित देशमुखांची गैरहजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:30 IST

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. मात्र, या मुलाखतीला शिराळ्याचे सत्यजित देशमुख व खानापूर-आटपाडीचे अ‍ॅड. सदाशिवराव पाटील गैरहजर होते. दरम्यान, जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी आमदार विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत यांच्यासह २५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

ठळक मुद्देकाँग्रेस मुलाखतीसाठी सदाभाऊ, सत्यजित देशमुखांची गैरहजेरीजिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी २५ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

सांगली : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. मात्र, या मुलाखतीला शिराळ्याचे सत्यजित देशमुख व खानापूर-आटपाडीचे अ‍ॅड. सदाशिवराव पाटील गैरहजर होते. दरम्यान, जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी आमदार विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत यांच्यासह २५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या.अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राजकीय पक्षांकडून सुरू आहे. शुक्रवारी कॉँग्रेसच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यापूर्वी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.अर्ज दाखल झालेल्या इच्छुकांच्या मुलाखती काँग्रेस कमिटीमध्ये पार पडल्या. राज्याच्या प्रभारी सोनल पटेल, जिल्हा निरीक्षक, प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष आ. विश्वजित कदम, चिटणीस अलका राठोड, जिल्हा प्रभारी प्रकाश सातपुते, जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेसच्या सदस्या जयश्रीताई पाटील, शैलजाभाभी पाटील आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मुलाखतीस ते गैरहजर राहिले, माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी उमेदवारीही मागितली नाही, शिवाय मुलाखतीसाठीही ते गैरहजर होते. पक्षातील दोन ज्येष्ठ नेत्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय झाला होता. जिल्ह्यात सर्वाधिक ११ इच्छुक मिरज मतदारसंघात आहेत.सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जयश्रीताई पाटील मुलाखतीवेळी पक्षाच्या विविध सेलसह महापालिकेतील नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केला. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही मुलाखत दिली. शहरात कॉँग्रेसचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.भाजप सरकारविरोधात अनेक आंदोलने केली असून त्याचा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. खानापूर-आटपाडी मतदारसंघातून राजाराम देशमुख यांनी उमेदवारी मागितली. अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांच्या कार्यपध्दतीवर काही कार्यकर्त्यांनी तक्रार केली. जतमधून विक्रम सावंत यांनी उमेदवारी मागितली. मुलाखतीनंतर इच्छुक उमेदवारांचा अहवाल प्रदेश कॉँग्रेस कमिटीला सादर केला जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी निश्चित होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSangliसांगली