लमाणतांडा (दरीबडची) सरपंचपदी सचिन राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:49 IST2021-02-21T04:49:20+5:302021-02-21T04:49:20+5:30
संख : जत तालुक्यातील लमाणतांडा (दरीबडची) येथील सरपंचपदी सचिन मोतिसिंग राठोड, तर उपसरपंचपदी इंदुमती बळिराम राठोड यांची बिनविरोध निवड ...

लमाणतांडा (दरीबडची) सरपंचपदी सचिन राठोड
संख : जत तालुक्यातील लमाणतांडा (दरीबडची) येथील सरपंचपदी सचिन मोतिसिंग राठोड, तर उपसरपंचपदी इंदुमती बळिराम राठोड यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसूल विभागाचे गौण खनिज वरिष्ठ अधिकारी विठ्ठल पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तलाठी गणेश पवार यांनी काम पाहिले.
लमाणतांडा (दरीबडची) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सहा जागा बिनविरोध झाल्या होत्या. फक्त एका जागेसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे प्रकाश भास्कर राठोड निवडून आले. सरपंचपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव होते. गावपातळीवर बैठक होऊन सरपंचपदी सचिन राठोड, उपसरपंचपदी इंदुमती लमाण यांची निवड झाली. नूतन सरपंच, उपसरपंच यांचा विठ्ठल पाटील, शारदा राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रवीण नाईक, शारदा लमाण, उषा राठोड, जयश्री राठोड, सचिन राठोड, ग्रामसेवक विष्णू बोरकर उपस्थित होते.
पती-पत्नी ग्रामपंचायतीत
लमाणतांडा (दरीबडची) ग्रामपंचायतीमध्ये सचिन राठोड व त्यांच्या पत्नी जयश्री राठोड यांची बिनविरोध निवडून आली आहे. पती-पत्नी दोघेही ग्रामपंचायतीमध्ये प्रथमच निवडून गेले आहेत.