सांगलीतील साद कोविड रुग्णालयास २५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST2021-07-11T04:19:31+5:302021-07-11T04:19:31+5:30

सांगली : महापालिकेच्या समडोळी रोडवरील कचरा डेपोवर प्रभाग क्र. १५ मधील रिक्षा घंटागाडीमध्ये साद कोविड रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट आढळून ...

Saad Kovid Hospital in Sangli fined Rs 25,000 | सांगलीतील साद कोविड रुग्णालयास २५ हजारांचा दंड

सांगलीतील साद कोविड रुग्णालयास २५ हजारांचा दंड

सांगली : महापालिकेच्या समडोळी रोडवरील कचरा डेपोवर प्रभाग क्र. १५ मधील रिक्षा घंटागाडीमध्ये साद कोविड रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट आढळून आल्यामुळे रुग्णालयास २५ हजाराचां दंड ठोठावण्यात आला.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. प्रभाग क्र. १५ मधील घंटागाडीत जैववैद्यकीय कचरा आढळून आल्यानंतर त्याची पडताळणी केली असता तो कचरा सांगलीतील साद कोविड हॉस्पिटलचा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर आयुक्त कापडणीस यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे व पर्यावरण अभियंता किल्लेदार यांनी रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे, किशोर कांबळे सहभागी झाले होते. सांगलीत यापूर्वीही काही डायग्नोस्टिक सेंटर व रुग्णालयांकडून जैववैद्यकीय कचरा उघड्यावर किंवा कोंडाळ्यात टाकल्याबद्दल महापालिकेने कारवाई केली आहे. कारवाई होऊनही असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना बाधा पोहोचत आहे.

Web Title: Saad Kovid Hospital in Sangli fined Rs 25,000