एस. टी. चालकास मारहाण करणाऱ्यास शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:09+5:302021-01-08T05:29:09+5:30

सांगली : अंजनी (ता. तासगाव) येथे एस.टी. चालकास बसमधून खाली ओढून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास न्यायालयाने दोषी धरून दोन कलमांन्वये ...

S. T. Punishment for beating the driver | एस. टी. चालकास मारहाण करणाऱ्यास शिक्षा

एस. टी. चालकास मारहाण करणाऱ्यास शिक्षा

सांगली : अंजनी (ता. तासगाव) येथे एस.टी. चालकास बसमधून खाली ओढून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्यास न्यायालयाने दोषी धरून दोन कलमांन्वये प्रत्येकी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. सागर बाळासाहेब भोसले (वय २७, रा. सावळी, मूळ रा. रांजणी) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी हा निकाल दिला.

फिर्यादी सुनील पोपट भोसले एसटीचालक आहेत. १३ जानेवारी २०१९ रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास ते एस.टी. बस अंजनी (ता. तासगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ लावण्यास जात होते. यावेळी सागर यास त्याचा मालवाहू टेम्पो बाजूला घेण्यास त्यांनी सांगितले. यावेळी गाडी बाजूला घेत नाही, तुला काय करायचे ते कर, म्हणून शिवीगाळ केली व चालक भोसले यांनी बसमधून खाली ओढून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सागरच्या विरोधात तासगाव पोलिसांत फिर्याद देण्यात आली होती. के. ए. रूपनर यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील दीपक कांबळे यांनी काम पाहिले. यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्याव्दारे सागर भोसले यास शिक्षा सुनाविण्यात आली.

----------------

फोटो ०४ सागर भोसले एडीटोरियल

Web Title: S. T. Punishment for beating the driver