ग्रामीण पत्रकारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:24 IST2021-02-08T04:24:11+5:302021-02-08T04:24:11+5:30
वारणावती : काळानुसार नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ग्रामीण पत्रकारांनी बदलले पाहिजे, असे मत ‘लोकमत’चे सांगलीचे आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे यांनी ...

ग्रामीण पत्रकारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे
वारणावती : काळानुसार नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ग्रामीण पत्रकारांनी बदलले पाहिजे, असे मत ‘लोकमत’चे सांगलीचे आवृत्तीप्रमुख श्रीनिवास नागे यांनी व्यक्त केले.
सागाव (ता. शिराळा) येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रथम सत्रातील ‘ग्रामीण पत्रकारिता स्वरूप व अपेक्षा’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन अध्यक्षपदी होते.
श्रीनिवास नागे म्हणाले की, ग्रामीण भागातील विविध प्रश्न वर्तमानपत्रांतून वार्ताहर मांडत असतात. वैचारिक पत्रकारितेचा ओघ कमी होत जाऊन सामूहिक पत्रकारितेचा दुर्गुण पसरत आहे. आकलन क्षमतेने पत्रकाराने बातमी केली, तरच निश्चित ग्रामीण पत्रकारही करिअर घडवून समाजात वेगळा ठसा उमटवू शकतो. वस्तुस्थितीची रोखठोकपणे मांडली केली पाहिजे.
यावेळी शेखर जोशी, चिंतामणी सहस्रबुधे, मंगेश मंत्री, शिराळा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुमंत महाजन, अध्यक्ष विजय पाटील, जिल्हा समन्वयक रवी कदम, उपाध्यक्ष गंगाराम पाटील, तालुका समन्वयक नारायण घोडे आदी उपस्थित होते.
फोटो- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाचे वतीने आयोजित पत्रकार कार्यशाळेत उद्घाटन प्रसंगी श्रीनिवास नागे यांनी मार्गदर्शन केले.