शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीचे उत्पादन घटल्याने भाकरीस महागाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:58 IST

मागील दोन वर्षांपासून जत, सांगोला, मंगळवेढा, बार्शी येथील डोण (काळी जमीन) परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ज्वारीचे आगार समजल्या जाणाऱ्या या भागात ज्वारीचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे दरात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

ठळक मुद्देज्वारीचे उत्पादन घटल्याने भाकरीस महागाईची झळसर्वत्र ज्वारीची टंचाई, डिसेंबर महिन्यापासून दरात वाढ

जत : मागील दोन वर्षांपासून जत, सांगोला, मंगळवेढा, बार्शी येथील डोण (काळी जमीन) परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ज्वारीचे आगार समजल्या जाणाऱ्या या भागात ज्वारीचे उत्पादन अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे दरात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.प्रतिकिलो २२ ते २५ रुपयांना मिळणारी ज्वारी आता ३२ ते ३५ रुपये किलो दराने विकली जात आहे. यामुळे लोकांनी ज्वारीपेक्षा गव्हाला पसंती दिली आहे. ग्रामीण भागात भाकरी, दही, चटणी, कांदा ही सकाळची न्याहरी ठरलेली असायची. परंतु ज्वारीचे दर वाढल्यामुळे शेतकरी कुटुंबातील लोकही आता पॅकिंग गहू आट्याची चपाती खाऊ लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारी खंडीने पिकायची त्यांच्याकडेही आता ज्वारीचा दुष्काळ पडल्याचे चित्र दिसून येत आहे.बार्शी, लातूर, उस्मानाबाद, मराठवाडा व कर्नाटकातील तिकोटा, बर्डोल, इंडी, चडचण या भागात शाळू, कार ज्वारी, हायब्रीड आदी पिके घेतली जातात. त्यामुळे हायब्रीड प्रतिकिलो १८ रुपये मिळतो. नंद्याळ शाळू २० रुपये किलो असतो. मध्यम शाळू २५ रुपये व बार्शी एक नंबरचा शाळू २८ ते ३० रुपये प्रतिकिलो असतो. परंतु दुष्काळ व पाणी टंचाईमुळे शाळूचा दर आता ४२ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य शेतकरी ही ज्वारी विकत घेऊन खाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांनी पॅकिंग गहू आट्याला पसंती दिली आहे.मंगळवेढा हे ज्वारीचे आगार, तर उस्मानाबाद ज्वारीला जीआय दर्जा मिळाला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पाऊस नसतानाही ज्वारी पिकाची पेरणी केली. खर्चाचा जुगार खेळला, परंतु पावसाअभावी पेरणी वाया जाऊन कर्जबाजारीपणा शेतकऱ्यांच्या पदरात पडला आहे.जत, सांगोला व मंगळवेढा या परिसरात ज्वारीचे पीक चांगले आले, तर येथील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात घरात शिल्लक असलेली ज्वारी विकत असतो. त्यामुळे त्या काळात ज्वारीचा दर कमी होतो. परंतु यावर्षी पीक नसल्याने शेतकऱ्यांनी घरातील जुना साठा विक्रीस काढला नाही. त्यामुळे सर्वत्र ज्वारीची टंचाई निर्माण होऊन डिसेंबर महिन्यापासून ज्वारीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली