विट्याच्या उपनगराध्यक्षपदी रूपाली पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:48+5:302021-06-16T04:35:48+5:30
विटा : विटा येथील उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या सत्ताधारी गटाच्या रुपाली धर्मेश पाटील यांची ...

विट्याच्या उपनगराध्यक्षपदी रूपाली पाटील यांची निवड
विटा : विटा येथील उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या सत्ताधारी गटाच्या रुपाली धर्मेश पाटील यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
विटा शहराच्या उपनगराध्यक्षा सारिका सपकाळ यांचा पदाचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सपकाळ यांनी नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्षपद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी नगरपालिकेच्या लोकनेते हणमंतराव पाटील सभागृहात पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी रूपाली पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची विटा शहराच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीनंतर नूतन उपनगराध्यक्ष पाटील यांचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, गंगाधर लकडे, विलासराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील. धर्मेश पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
फोटो : १५ विटा १
ओळ : विटा शहराच्या उपनगराध्यक्षपदी रूपाली पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांचा माजी आमदार सदाशिवराव पाटील, गंगाधर लकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील, विलासराव कदम, धर्मेश पाटील उपस्थित होते.