शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या दुचाकीवरुन महिलेची पर्स लंपास, सांगलीतील घटना : चोरट्यांचा पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 16:03 IST

दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या गणेशनगरमधील शिल्पा सुकेश गौडा या महिलेची दुचाकीला अडकविलेली पर्स चोरट्यांनी हातोहात लंपास केली. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा औद्योगिक वसाहतमध्ये बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. शिल्पा गौडा यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. पण ते सापडले नाहीत.

ठळक मुद्देसांगलीत धावत्या दुचाकीवरुन महिलेची पर्स लंपासचोरट्यांचा पाठलाग केला, पण ते सापडले नाहीत

सांगली : दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या गणेशनगरमधील शिल्पा सुकेश गौडा या महिलेची दुचाकीला अडकविलेली पर्स चोरट्यांनी हातोहात लंपास केली. माधवनगर रस्त्यावरील वसंतदादा औद्योगिक वसाहतमध्ये बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. शिल्पा गौडा यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. पण ते सापडले नाहीत.शिल्पा गौडा यांचे कुपवाड रस्त्यावरील शालिनीनगर माहेर आहे. त्या सांगलीत गणेशनगरमध्ये राहतात. बुधवारी दुपारी त्या दुचाकीवरुन माहेरी नातेवाईकांना भेटण्यास गेल्या होत्या. सायंकाळी साडेसहा वाजता त्या सासरी गणेशनगरमध्ये जाण्यास निघाल्या. अहिल्यानगरमार्गे त्या वसंतदादा औद्योगिक वसाहतमध्ये आल्या.

दुरसंचार कार्यालयासमोर आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून एक दुचाकी आली. दुचाकीवर दोन चोरटे होते. यातील पाठीमागील चोरट्याने शिल्पा यांची दुचाकीच्या हॅण्डलला अडकविलेली पर्स हातोहात लंपास केली. त्यानंतर दोघेही वसाहतच्या कमानीतून बाहेर पडून सांगलीच्यादिशेने गेले.

शिल्पा यांनी डेक्कन मॅन्युफॅक्चरींग हॉलपर्यंत पाठलाग केला. पण दोन्ही चोरटे रस्त्यावरील वाहनाच्या गर्दीचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. पर्समध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स, दोन मोबाईल व साडेती हजाराची रोकड होती. याबाबत शिल्पा गौडा यांनी गुरुवारी सकाळी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

 

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हा