शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील २,१३७ शाळांमध्ये आरटीई प्रवेश सुरू, प्रवेशासाठी नवे नियम काय..जाणून घ्या

By अशोक डोंबाळे | Updated: April 17, 2024 17:55 IST

२६ हजार ३४३ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त

सांगली : बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमांतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२४ - २५च्या प्रवेशासाठीची अर्ज प्रक्रिया अखेर मंगळवारपासून सुरू झाली आहे. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच ही अर्ज प्रक्रिया इतकी विलंबाने सुरू झाली असून, आरटीईअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करावा लागणार आहे. जिल्ह्यातील २ हजार १३७ शाळांमध्ये २६ हजार ५४३ रिक्त जागांसाठी प्रवेश सुरू झाला आहे.वंचित, सामाजिक दुर्बल आणि मागास घटकातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. या शाळांमधील २५ टक्के जागा ‘आरटीई’मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. यंदा ही प्रक्रिया जवळपास दोन महिने रखडली होती. शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत या वर्षीपासून काही बदल केले आहेत. या बदलाच्या अंमलबजावणीसाठी शाळा नोंदणीलाच उशीर झाल्याने अर्ज प्रक्रियेलाही विलंब झाला.त्यामुळे गेली अनेक वर्षे फेब्रुवारीत सुरू होणारी अर्ज प्रक्रिया यंदा एप्रिल महिन्यात सुरू झाली आहे. या जागांवरील प्रवेशासाठी अर्ज करण्यास शिक्षण विभागाने सद्यस्थितीत ३० एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. परंतु, यंदा वाढलेल्या शाळा आणि जागा लक्षात घेता, नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी २ हजार १३७ शाळांनी नोंदणी केली आहे. या प्रवेशांसाठी २६ हजार ३४३ जागा रिक्त आहेत.

प्रवेशासाठी असे आहेत नवीन नियमया बदलांनुसार विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरादरम्यान, अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल, तर एक किलोमीटरच्या अंतरावरील खासगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या शाळांची निवड करताना शासकीय शाळा, अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शेवटी खासगी शाळा या प्राधान्यक्रमानुसार मुलांना प्रवेश मिळणार आहे.

आरटीई योजनेत जिल्ह्यातील २ हजार १३७ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २६ हजार ३४३ रिक्त जागांसाठी पालकांनी ३० एप्रिलपर्यंत अर्ज करावेत. नियमानुसार सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. -मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळा