मंगलनाथ मंदिराच्या सभामंडपासाठी ५० लाख रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST2021-05-01T04:25:12+5:302021-05-01T04:25:12+5:30

मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील ग्रामदैवत मंगलनाथ मंदिरासमोरील जागेत नवीन भव्य सभामंडपासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर ...

Rs 50 lakh sanctioned for assembly hall of Mangalnath temple | मंगलनाथ मंदिराच्या सभामंडपासाठी ५० लाख रुपये मंजूर

मंगलनाथ मंदिराच्या सभामंडपासाठी ५० लाख रुपये मंजूर

मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील ग्रामदैवत मंगलनाथ मंदिरासमोरील जागेत नवीन भव्य सभामंडपासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, दुसऱ्या टप्प्यात आणखी २० लाखांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

ते म्हणाले, मांगले व परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या मंगलनाथ मंदिराच्या समोरच्या जागेत सभामंडप व्हावा, अशी गेल्या अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी होती. २०१४ साली मी आमदार असताना सभामंडपासाठी निधी मंजूर केला होता. या कामास सुरुवातही होणार होती. दरम्यानच्या काळात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्तांतर झाल्यामुळे नंतरच्या लोकप्रतिनिधींनी मंजूर झालेला निधी रद्द केला.

मांगले ग्रामस्थांबरोबर माझीही मंगलनाथावर श्रद्धा आहे. त्यामुळे मी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारावेळी मंगलनाथाच्या सभामंडपासाठी पुन्हा निधी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार मंगलनाथ देवालयाच्या समोरच्या प्रशस्त जागेत आता मोठा सभामंडप होणार आहे. लहान-मोठ्या कार्यक्रमांबरोबरच गोरगरिबांच्या विवाह सोहळ्यासाठी हा सभामंडप उपयोगी ठरणार आहे.

Web Title: Rs 50 lakh sanctioned for assembly hall of Mangalnath temple