तरुणाच्या बँक खात्यातून ३० हजार रुपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:33+5:302021-01-14T04:21:33+5:30

शोएब मोमीन यांना २४ डिसेंबर रोजी एका महिलेने फोन करून ‘तुमचे हेल्थ इन्शुरन्स अ‍ॅक्टिव्हेट झाले आहे, आज डेबिट ...

Rs 30,000 from the youth's bank account | तरुणाच्या बँक खात्यातून ३० हजार रुपये लंपास

तरुणाच्या बँक खात्यातून ३० हजार रुपये लंपास

शोएब मोमीन यांना २४ डिसेंबर रोजी एका महिलेने फोन करून ‘तुमचे हेल्थ इन्शुरन्स अ‍ॅक्टिव्हेट झाले आहे, आज डेबिट पडणार आहे. तुम्हाला डिअ‍ॅक्टिव्हेट करायचे असेल तर तुमच्या मोबाईवर एक नंबर येईल तो सांगा,” असे सांगितले. मोमीन यांनी ‘मी बँकेत जाऊन डिअ‍ॅक्टीव्हेट करतो’ असे सांगितल्याने महिलेने त्यांना क्रेडिट कार्ड नंबर विचारला. मोमीन यांनी माझ्याजवळ क्रेडिट कार्ड नाही असे सांगून फोन बंद केला.

त्यानंतर सनी तिवारी नावाच्या व्यक्तीने अशीच विचारणा केली. त्यांनाही मोमीन यांनी बँक खात्याची माहिती दिली नाही. मात्र तरीही रेजर पे ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बँक खात्यातून २९ हजार ७२५ रुपये काढून घेण्यात आले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rs 30,000 from the youth's bank account