शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सांगली जिल्ह्यात आणखी २८५ कोटींची कर्जमाफी,६६ हजार शेतकºयांना १०१ कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:09 AM

सांगली : शासनाने कर्जमाफीची जिल्ह्याची तिसरी यादी बुधवारी जाहीर केली. यामध्ये एकूण ८0 हजार ९२ शेतकºयांना २८५ कोटी रुपयांची कर्जमाफी

ठळक मुद्देतिसरी यादी जाहीर : दोन दिवसात उर्वरित रक्कम मिळणार आहे

सांगली : शासनाने कर्जमाफीची जिल्ह्याची तिसरी यादी बुधवारी जाहीर केली. यामध्ये एकूण ८0 हजार ९२ शेतकºयांना २८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. अनुदानाचा लाभ जिल्ह्यातील ६५ हजार ५४७ शेतकºयांना मिळणार असून त्यांच्या अनुदानाची एकूण रक्कम १0१ कोटी रुपये आहे.

दीड लाखाच्या आतील ३०३७ शेतकºयांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे. येत्या चार दिवसात ही रक्कम संबंधित शेतकºयांच्या बॅँक खात्यावर वर्ग होणार आहे. कर्जमाफीच्या आजअखेर जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या तीन याद्या जाहीर झाल्या आहेत. पहिल्या यादीत १ हजार ३४६ शेतकºयांना ६ कोटी ५२ लाखांची कर्जमाफी मिळाली होती. दुसºया यादीत १९ हजार ७७६ शेतकºयांना ७२ कोटींची कर्जमाफी आहे. बुधवारी दुपारी तिसरी यादी शासनाने जाहीर केली.

यात दीड लाखाच्या आतील थकीत शेतकरी, दीड लाखावरील एकरकमी कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांची व नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांचा समावेश आहे.तीन हजार ३७ शेतकºयांचे दीड लाखाच्या आतील शंभर टक्के कर्ज माफ झाले आहे. त्यांना १० कोटी ९४ लाख ९२ हजार ५९४ रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे. दीड लाखापेक्षा जास्त कर्ज थकीत असणाºया व दीड लाखावरील सर्व कर्ज एकरकमी कर्ज परतफेड योजनेंतर्गत फेडण्यास तयार असणाºया ११ हजार ५०८ शेतकºयांचा यात समावेश आहे. या शेतकºयांना दीड लाखावरील रक्कम अदा करण्यास ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर संबंधितांना दीड लाखाची कर्जमाफी मिळणार आहे. त्यांची रक्कम सुमारे १७२ कोटी रुपये आहे. जानेवारीमध्ये याचे वाटप होणार आहे. जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाºया ६५ हजार ५४७ शेतकºयांना १०१ कोटी ९ लाख ८२ हजार ३३७ रूपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. यातील ६२ कोटी ६६ लाख ३३ हजार ५८० रुपये जिल्हा बॅँकेला प्राप्त झाले असून दोन दिवसात उर्वरित रक्कम मिळणार आहे. ही रक्कम लाभार्थी शेतकºयांच्या बॅँक खात्यावर पुढील चार दिवसात वर्ग करण्यात येणार आहे.असा मिळणार लाभ...कर्जप्रकार शेतकरी रक्कमदीड लाखापर्यंतची ३0३७ १0,९४,७९,0१0दीड लाखावरील ११,५0८ १७२,६२,00,000नियमित कर्जदार ६५,५४७ १0१,0९,८२,३३७एकूण ८0,0९२ २८४,६६,६१,३४७