शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने पपई बागेवर फिरविला रोटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 03:13 IST

दराअभावी नैराश्य : खरेदीदार न मिळाल्याने फळे रस्त्यावर फेकली

कासेगाव (जि. सांगली) : कासेगाव (ता. वाळवा) येथील एका शेतकºयाने विक्रीसाठी पाठविलेली ४ टन पपई संबंधित व्यापाºयाने मालाची आवक जास्त असल्याचे कारण देऊन घेण्यास नकार दिला. अन्य कोणत्याही ठिकाणी खरेदीदार न मिळाल्याने नाराज होऊन शेतकºयाने पपई रस्त्यावर फेकून दिली. नैराश्येतून या शेतकºयाने १ एकरातील उर्वरीत पपईच्या पिकावर रोटर फिरवून सर्व पीकच जमीनदोस्त केले.

कासेगाव येथील विश्वनाथ बाबूराव वगरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी कर्ज काढून एक एकर पपईची लागवड केली होती. मोठ्या कष्टाने त्यांनी पपईची बाग जोमाने आणली होती. त्यासाठी सुमारे १ लाखापेक्षा जास्त खर्च केला होता. त्यामुळे फळधारणाही चांगलीझाली होती. मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत पपईला मागणी व दरही चांगला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पपई तोडणीस त्यांनी सुरुवात केली होती. मात्र अचानक बाजारपेठेत पपईचा दर खूपच कमी झाला. पाठविलेल्या मालातून वाहतूक खर्चही मिळत नसल्याने त्यांनी सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक व्यापाऱ्यांना २ रुपये किलो दराने ६ टन पपईची विक्री केली. चार दिवसांपूर्वी एका व्यापाºयाला विचारून पपईची तोडणी केली. ४ टन पपई संबंधित व्यापाºयाला पाठविल्या. मात्र जास्त मालाची आवक झाल्याचे कारण देऊन त्याने तो माल उतरवून घेण्यास नकार दिला. शेतकºयाने वारंवार विनंती करूनही तो माल व्यापाºयाने खरेदी केला नाही. त्यानंतर विश्वनाथ वगरे यांनी इतर ठिकाणी कोणी व्यापारी हा माल घेते का, ते पाहिले. पण स्थानिक कोणीच घ्यायला तयार नव्हते. मुंबई, पुणे येथील वाहतूक खर्च आवाक्याबाहेरचा असल्याने, तिकडे पपई पाठवून तोटाच होणार हे लक्षात आले. या सर्व नैराश्येतून भरलेली पपईची गाडी त्यांनी कासेगावात आणली आणि सर्व पपई रस्त्यावर ओतल्या. एवढेच नव्हे, तर एक एकरातील सर्व पपईची झाडे रोटरच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी