कर्नाळ हायस्कूलमध्ये रोटरीतर्फे सॅनिटरी नॅपकिन यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:45+5:302021-02-24T04:28:45+5:30

कर्नाळ हायस्कूल येथे रोटरीतर्फे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्र बसविण्यात आले. सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊनतर्फे कर्नाळ हायस्कूलमध्ये ...

Rotary Sanitary Napkin Machine at Karnal High School | कर्नाळ हायस्कूलमध्ये रोटरीतर्फे सॅनिटरी नॅपकिन यंत्र

कर्नाळ हायस्कूलमध्ये रोटरीतर्फे सॅनिटरी नॅपकिन यंत्र

कर्नाळ हायस्कूल येथे रोटरीतर्फे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग यंत्र बसविण्यात आले.

सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊनतर्फे कर्नाळ हायस्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसविण्यात आले. डॉ. सुधीर गवळी व उज्ज्वला गवळी यांच्या हस्ते यंत्र प्रदान करण्यात आले. या वेळी उज्ज्वला गवळी यांचे ‘उमलती कळी’ या मुलींच्या वाढत्या वयात घ्यावयाची काळजी या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील, उपाध्यक्ष जमादार, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र लंबे, सचिव धर्मेंद्र खिलारे, विलास सुतार, प्रशांत घोडके, संताजी कदम, अनिल इंगळे, गजानन सावंत आदी उपस्थित होते. शिक्षण संस्थेचे संचालक पी.एल. रजपूत, उदयसिंग कदम, अतुल पाटील, विष्णू पाटील व मुख्याध्यापकांनी संयोजन केेले.

Web Title: Rotary Sanitary Napkin Machine at Karnal High School