रोटरीतर्फे व्होकेशन पुरस्काराने विविध क्षेेत्रांतील व्यावसायिकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:09+5:302021-02-05T07:32:09+5:30

रोटरी क्लबतर्फे विविध व्यावसायिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सत्यनारायण झंवर, प्रशांत बेदमुथा, मीना आपटे, धनश्री आपटे, प्रमोद पाटील, ...

Rotary honors professionals in various fields with Vocation Award | रोटरीतर्फे व्होकेशन पुरस्काराने विविध क्षेेत्रांतील व्यावसायिकांचा गौरव

रोटरीतर्फे व्होकेशन पुरस्काराने विविध क्षेेत्रांतील व्यावसायिकांचा गौरव

रोटरी क्लबतर्फे विविध व्यावसायिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सत्यनारायण झंवर, प्रशांत बेदमुथा, मीना आपटे, धनश्री आपटे, प्रमोद पाटील, सुहास जोशी आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : रोटरी क्लबतर्फे विविध क्षेत्रांतील कर्तबगार व्यावसायिकांना रोटरी व्होकेशनल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. व्यावसायिक मीना आपटे व धनश्री आपटे, पोस्टमन दिलीप खोत, वडापाव व्यावसायिक चंद्रकांत डिसले, बाळासाहेब डिसले, नाश्ता सेंटरचालक अनंत गराटे, क्रीडाशिक्षक अमेय पाटील, रसायन व्यावसायिक प्रवीण चौगुले व धान्य व्यापारी सिद्धू चित्तरगी यांचा सन्मान झाला. सत्यनारायण झंवर व प्रशांत बेदमुथा यांच्या हस्ते चांदीचे नाणे व सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी सनतकुमार आरवाडे, मोहनीभाई देसाई, रविकिरण कुलकर्णी, उदय पाटील, प्रमोद चौगुले, अरुण दांडेकर, रामकृष्ण चितळे आदी उपस्थित होते. सत्कारमूर्तींच्या वतीने धनश्री आपटे व अमेय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी स्वागत केले. डॉ. सुहास जोशी यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन सचिन कौले यांनी केले.

-------

Web Title: Rotary honors professionals in various fields with Vocation Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.