रोटरीतर्फे अभिनव व प्रज्ञा प्रबोधिनीला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:20+5:302021-01-19T04:28:20+5:30
अभिनव बालक मंदिरमध्ये रोटरीतर्फे सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग यंत्रणेचे उद्घाटन नितीन शहा व मधुरा किल्लेदार यांनी केले. यावेळी राजेंद्र लंबे, ...

रोटरीतर्फे अभिनव व प्रज्ञा प्रबोधिनीला मदत
अभिनव बालक मंदिरमध्ये रोटरीतर्फे सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग यंत्रणेचे उद्घाटन नितीन शहा व मधुरा किल्लेदार यांनी केले. यावेळी राजेंद्र लंबे, धर्मेंद्र खिलारे, मल्लिकार्जुन बडे, सुधीर म्हेत्रे, प्रशांत घोडके आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाउन व सावरकर इंटरॅक्ट क्लबतर्फे सावरकर प्रतिष्ठानला सॅनिटरी व्हेंडिंग मशीन व इनसिनरेटर प्रदान करण्यात आले. अभिनव बालक मंदिर व प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेत ते बसविण्यात आले. रोटरीच्या वॉटर सॅनिटेशन फोकस एरिया प्रकल्पानुसार यंत्रणा देण्यात आली. असिस्टंट गव्हर्नर नितीन शहा व डॉ. मधुरा किल्लेदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र लंबे, सचिव धर्मेंद्र खिलारे, मल्लिकार्जुन बडे, सुधीर म्हेत्रे, प्रशांत घोडके, सुभाष शहा आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष विजय नामजोशी, मुख्याध्यापक सुबोध कुलकर्णी, महादेव कुंभार, प्रशांत घोडके, बीना जोशी आदी उपस्थित होते.
----------