सर्वच समस्यांचे मूळ वाढत्या लोकसंख्येत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:47+5:302021-07-14T04:31:47+5:30
पलूस : जगाच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर भारताची लोकसंख्या वाढत आहे. तथापि जननदर कमी होत आहे. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेवर लोकसंख्यावाढ ...

सर्वच समस्यांचे मूळ वाढत्या लोकसंख्येत नाही
पलूस : जगाच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर भारताची लोकसंख्या वाढत आहे. तथापि जननदर कमी होत आहे. त्यामुळे एका विशिष्ट मर्यादेवर लोकसंख्यावाढ स्थिरावेल. केवळ वाढत्या लोकसंख्येमुळे सर्व समस्या वाढतात, असा बाऊ करणे योग्य नाही. आर्थिक, सामाजिक, विषमतेत बहुतांश समस्यांचे मूळ आहे. त्यामुळे आर्थिक समता, सर्वांना समान संधी व सामाजिक न्यायाला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही. वाय. (आबा) पाटील यांनी व्यक्त केले.
नागराळे (ता. पलूस) येथे ग्रामविकास वाचनालय व्ही. वाय. (आबा) पाटील समाज प्रबोधन अकॅडमी व ग्रामपंचायतीतर्फे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त खुले विचारमंथन आयोजित केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. शंकरराव कुंभार म्हणाले, लोकसंख्येचे वाढते संकट गंभीर आहे. त्यामुळे बेरोजगारी, दारिद्र्य, प्रदूषण पर्यावरणाचा ऱ्हास हाेत आहे. याप्रसंगी झालेल्या खुल्या चर्चेत शशिकांत पाटील, वृक्षमित्र महंमद सैदापुरे बडेभैय, प्रकाश पाटील यांनी परखड मत व्यक्त केले.
याप्रसंगी सुरुवातीला दीपप्रज्वलन करून आद्य समाज क्रांतिकारक महात्मा फुले यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी अभिवादन केले. याप्रसंगी प्रा ए. सी. पाटील यांनी स्वागत केले; तर समारोप युवक नेते विशाल दिंडे यांनी केला. चर्चासत्रात डी. एन. पवार, संपतराव जाधव, दादासाहेब पाटील, ग्रंथपाल राहुल पाटील, जितेंद्र पाटील, हणमंतराव दिंडे हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.