शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील जीएसटी कार्यालय स्थलांतर मागे घ्या, सुधीर गाडगीळ यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 18:22 IST

अधिकाऱ्यांशी चर्चा

सांगली : सांगलीतील राज्य जीएसटी कार्यालयाच्या स्थलांतरचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. याप्रश्नी लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले.आमदार गाडगीळ यांनी अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली राज्य जीएसटी विभागाची पुनर्रचना करण्याची गरज आहे. सांगली जीएसटी विभागात प्रशासनासाठी एक सहआयुक्त आणि अपीलसाठी एक उपायुक्त तातडीने नियुक्त करणे आवश्यक आहे. सांगली जीएसटी कार्यालयातील दोन उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, चार राज्यकर अधिकारी, ३२ करनिरीक्षक आणि संबंधित सहायक कर्मचारी यांची पदे शासन निर्देशानुसार रद्द करण्यात आली आहेत. ती पदे पुनर्स्थापित करावीत.सांगली जीएसटी विभागीय लेखा परीक्षण हे कोल्हापूर राज्य जीएसटी कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे. हे सर्व प्रस्तावित बदल सांगली जिल्ह्यातील करदात्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहेत. त्यामुळे लेखापरीक्षणाची व्यवस्थाही सांगली जीएसटी कार्यालयातच पूर्ववत ठेवावी. सांगली विभागातील करदात्यांना अपिलांच्या सुनावणीसाठी कोल्हापूरला ५० किलोमीटर अंतर कापून जाणे अत्यंत गैरसोयीचे आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडीसारख्या ठिकाणाहून हे अंतर १६० किलोमीटर आहे. त्यामुळे अपिल सुनावणीची व्यवस्था सांगली कार्यालयातच हवी.सांगली विभागातील नोंदणीकृत करदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सांगली जिल्ह्यातील जीएसटीचे संकलन संपूर्ण कोल्हापूर विभागात सर्वाधिक आहे. सातारा जिल्ह्याचे जीएसटीचे उत्पन्न सांगली जिल्ह्याच्या तुलनेने कमी आहे. तरीही तेथे सहआयुक्त आणि अपिलीय अधिकारी ही पदे आहेत.

अधिकाऱ्यांशी चर्चाअजित पवार यांनी सांगली कार्यालय स्थलांतरप्रश्नी मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रश्नी सर्व सकारात्मक निर्णय तातडीने घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी गाडगीळ यांना दिले.

टॅग्स :SangliसांगलीSudhir Gadgilसुधीर गाडगीळAjit Pawarअजित पवारGST Officeमुख्य जीएसटी कार्यालय