रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:26 IST2021-05-16T04:26:00+5:302021-05-16T04:26:00+5:30

विरंगुळा केंद्राकडे मनपाचे दुर्लक्ष सांगली: येथील चिंतामणीनगर परिसरात विरंगुळा केंद्र आहे. मात्र, केवळ नामफलक लावून संबंधित मोकळे झाले आहे. ...

Rohyo's demand to start work | रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी

रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी

विरंगुळा केंद्राकडे मनपाचे दुर्लक्ष

सांगली: येथील चिंतामणीनगर परिसरात विरंगुळा केंद्र आहे. मात्र, केवळ नामफलक लावून संबंधित मोकळे झाले आहे. येथील ज्येष्ठांना बसण्यासाठी या केंद्राची दुरुस्ती करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, या विरंगुळा केंद्रामध्ये झुडपे, तसेच गवत वाढले आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

धूर फवारणी करण्याची मागणी

सांगली : शहरातील काही वाॅर्डात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागात आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील वाॅर्डांमध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Rohyo's demand to start work