इस्लामपुरात मुद्रांक विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:37+5:302021-03-04T04:49:37+5:30

: इस्लामपूर येथे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना राजेंद्र पाटील, दादासाहेब पाटील, अशोक शेडगे यांनी निवेदन दिले. लोकमत न्यूज नेटवर्क ...

Robbery of customers by stamp dealers in Islampur | इस्लामपुरात मुद्रांक विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

इस्लामपुरात मुद्रांक विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

: इस्लामपूर येथे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना राजेंद्र पाटील, दादासाहेब पाटील, अशोक शेडगे यांनी निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील तहसील कार्यालय परिसरातील मुद्रांक विक्रेत्यांकडून सामान्य जनतेची लूट सुरू असल्याचा आरोप साखराळे येथील राजेंद्र पाटील यांनी केला आहे. मुद्रांकापेक्षा जादा पैसे घेणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना दिले आहे.

तहसील कार्यालय परिसरातील मुद्रांक विक्रेत्यांकडे शेतकरी, शालेय विद्यार्थी आणि नागरिक हे विविध कामांसाठी मुद्रांक घेण्यासाठी येतात. मात्र, यावेळी विक्रेत्यांकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. १०० ते ५०० रुपयांच्या मुद्रांकासाठी १० ते ५० रुपये जादा द्यावे लागतात. त्यासाठी हे विक्रेते ग्राहकांची अडवणूक करून जादा पैसे घेतात. या गैरकारभाराविरुद्ध महसूल प्रशासनाने कठोर कारवाई करावी.

यावेळी अहमद मुंढे, नीलेश खोत, दीपक पाटील उपस्थित होते.

Web Title: Robbery of customers by stamp dealers in Islampur