शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चोरी करण्यास गेला अन जीवास मुकला, कोल्हापूर रोडवरील घटना

By शीतल पाटील | Updated: November 10, 2022 20:14 IST

गेट चोरून नेत असताना गेट अंगावर पडून चोरट्याचा मृत्यू

सांगली: शहरातील कोल्हापूर रोडवरील शास्त्री चौक येथे एका घराच्या छतावरील लोखंडी गेट चोरून नेत असताना गेट अंगावर पडून चोरट्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार ०९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. अजय राजू माळी (वय २७ रा. माडग्याळ ता. जत सध्या. सांगली) असे मृताचे नाव आहे. या घटनेची सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी रेखा कुमार झेंडे (वय ५५) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

मृत अजय माळी हा मूळचा माडग्याळ येथील रहिवाशी आहे. त्याचे वडील बेपत्ता आणि आईचा मृत्यू झाल्याने तो सांगलीमध्ये काही महिन्यांपूर्वी आला होता. शहरात फिरस्ता म्हणून छोटीमोठी कामे करत होता. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर रोडवरील शास्त्री चौक येथील रेखा झेंडे यांनी त्याला घरावर आलेले झाड तोडण्याचे काम सांगितले होते. यावेळी तो झाड तोडत असताना घरावर लोखंडी गेट पडलेले दिसले. त्यादिवशी तो साफसफाई करून निघून गेला.

बुधवारी तो लोखंडी गेट चोरून नेण्यासाठी टेरेसवर गेला. लोखंडी गेट घेऊन उतरत असताना तोल जाऊन तो पडला. त्याच्या अंगावर लोखंडी गेट पडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी