सांगलीत तरुणास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:24 IST2021-04-14T04:24:37+5:302021-04-14T04:24:37+5:30

सांगली : शहरातील गणेशनगरमधील जलतरण तलावाजवळ तरुणास धारधार शस्त्राने धमकावत जिवे मारण्याची धमकी देत लुटण्यात आले. हा प्रकार शुक्रवारी ...

Robbed a young man in Sangli | सांगलीत तरुणास लुटले

सांगलीत तरुणास लुटले

सांगली : शहरातील गणेशनगरमधील जलतरण तलावाजवळ तरुणास धारधार शस्त्राने धमकावत जिवे मारण्याची धमकी देत लुटण्यात आले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला होता. याप्रकरणी चौघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ओंकार जाधव, शुभम शिकलगार, सुज्योत कांबळे, आकाश जाधव (सर्व रा. रमामातानगर) अशी संशयितांची नावे आहेत. हैदरअली हुमायुन पठाण (वय ३०, रा. रमामातानगर, सांगली) याने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हैदरअली पठाण यास सुज्योत कांबळे याने जलतरण तलावाजवळ बोलावून घेतले. त्यावेळी पठाण आणि त्याचा मित्र गणेश सातपुते त्याठिकाणी आले. त्यावेळी ओंकार जाधव याने पठाण यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एक हजाराचे घड्याळ जबरदस्तीने काढून घेतले. शुभम शिकलगार याने पाचशे रुपयांचा गॉगल काढून घेतला. ओंकार आणि सुज्योत या दोघांनी पठाण यास शस्त्राने धमकावत जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: Robbed a young man in Sangli