मिरजेतील एकाला लुटले; चाैघांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:20 IST2021-06-01T04:20:56+5:302021-06-01T04:20:56+5:30

मिरज : मिरजेतील ख्वॉजा वसाहतीत भरदुपारी भीमसेन ऊर्फ भिमशा निगाप्पा नाईक यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा ४० ...

Robbed one of Miraj; Crime against Chaigha, both arrested | मिरजेतील एकाला लुटले; चाैघांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक

मिरजेतील एकाला लुटले; चाैघांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक

मिरज : मिरजेतील ख्वॉजा वसाहतीत भरदुपारी भीमसेन ऊर्फ भिमशा निगाप्पा नाईक यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा ४० हजार रुपयांचा ऐवज चौघांनी लुटला. याप्रकरणी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल करून सोहेल ऊर्फ चुआ निजाम सोलकर व अरबाज मोहंमद काझी या दोघांना पोलिसांनी अटक केली.

सोमवारी दुपारी दोन वाजता नाईक सहकाऱ्यांसमवेत ख्वॉजावसाहतीत बीएसएनएल कार्यालयासमोरून चालत जात होते. त्यावेळी चौघांनी त्यांना अडवून नाईक यांच्या खिशातील ३९ हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल काढून घेऊन पोबारा केला. याबाबत तक्रार दाखल होताच गांधी चौक पोलिसांनी संशयित चौघांना ताब्यात घेतले. त्यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. सोलकर व काझी या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत गांधी चौक पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Robbed one of Miraj; Crime against Chaigha, both arrested