शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
3
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
4
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
5
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
6
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
7
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
8
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
9
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
10
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
11
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
12
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
13
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
14
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
15
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
16
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
17
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
18
जो रुट सुसाट! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पण इंग्लंड बॅटरला खरंच ते शक्य होईल का?
19
१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा
20
एअरटेलने स्वस्तातले ३० दिवसांचे दोन प्लॅन बंद केले; आता जास्त पैसे मोजल्याशिवाय पर्याय नाही
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची वर्षपूर्ती: सांगली जिल्ह्यात रस्ते, पूल झाले... पर्यटन, उद्योगाचे काम रेंगाळले

By संतोष भिसे | Updated: December 5, 2025 15:26 IST

विद्यापीठाचे उपकेंद्र, महत्त्वाचे पूल, म्हैसाळ योजना सौरऊर्जेवर हे प्रकल्प मार्गी, सांगली-कोल्हापूर रस्त्याचे दुखणेही ठसठसते

संतोष भिसेसांगली : महायुतीसरकार सत्तेत आल्याला शुक्रवारी (दि. ५) एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात सांगली जिल्ह्यासाठी सरकारने काय दिले आणि काय दिले नाही, याची गोळाबेरीज केली असता काहीसे समाधानकारक चित्र पुढे येते. विकासाच्या मार्गावर जिल्ह्याला पुढे नेताना बरंच काही दिलंय, पण अजूनही बरचसं राहिलंय अशीच स्थिती आहे.राज्याच्या मंत्रिमंडळात सांगली जिल्हा नाही, असे अनेक वर्षांनी घडले आहे. त्याचा फटका जिल्ह्याच्या विकासाच्या गतीला बसेल याची भीती वर्षभरापूर्वी व्यक्त होत होती. पण ही भीती अनाठायी असल्याचे सरकारने दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना चालना देताना, अनेक नव्या प्रकल्पांची ब्ल्यू प्रिंटही मांडली आहे.विशेषत: कोल्हापूरचे रहिवासी आणि कोथरुडचे आमदार असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सांगलीकरांचा भ्रमनिरास केला नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद यासह विविध प्रशासकीय संस्थांची सांगड घालत नवनव्या योजनांना गती दिल्याचे दिसते.पूर्ण झालेले प्रकल्पसांगलीतील आयर्विनला समांतर पूल, हरीपूर-कोथळी पूल, पंचशीलनगर व चिंतामणीनगर रेल्वे उड्डाण पूल, वसगडे रेल्वे उड्डाण पूल, मिरजेत कृष्णाघाट रेल्वे उड्डाण पूल हे महत्त्वाचे पूल नागरिकांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्याच्या विकासाचा कळीचा मुद्दा असणारा कवलापूर विमानतळाचा प्रकल्प मार्गी लागल्याचे दिसत आहे. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरात कार्यान्वित झाले आहे.

ही आश्वासने कायम१. लॉजिस्टिक पार्क आणि ड्रायपोर्टची गाजराची पुंगी मात्र वाजली तर वाजली अशाच अवस्थेत आहे. आयटी पार्क अद्याप स्वप्नरंजनातच आहे, तर जिल्ह्याला भेडसावणाऱ्या महापुरावरील उपायांना अद्याप मुहूर्त नाही.२. जतच्या दुष्काळावर उपाय म्हणून तुबची-बबलेश्वर योजना, महत्त्वाच्या सांगली-कोल्हापूर मार्गाचे रुंदीकरण, सांगलीच्या शासकीय रुग्णालयाचा कायापालट या दुखण्यांवर मात्र अद्याप औषध सापडलेले नाही.

जनतेच्या अपेक्षा काय?सांगली-कोल्हापूर हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता चारपदरी व्हावा आणि ५० किलोमीटरचा हा प्रवास अर्ध्या तासात पूर्ण व्हावा इतकेच माफक स्वप्न सांगलीकर नागरिक वर्षानुवर्षे बाळगून आहेत.सांगली, मिरज या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात आणि मिरज-पंढरपूर हा ब्रॉडगेज पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावा हीदेखील अपेक्षा अद्याप जीव धरून आहे.सांगलीला आलेल्या पाहुण्याला पर्यटनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात न्यावे लागते ही खंत कधी दूर होणार? ही भावनादेखील सतत टोचणारी आहे. सांगली, मिरजेच्या औद्योगिक वसाहतींना बळ देणारी एखाद्या मदर इंडस्ट्रीचीही प्रतीक्षाच आहे.

कोणत्या समस्या सुटल्या?सांगलीत पंचशीलनगर रेल्वे उड्डाण पूल, पोलिस विभागाला अत्याधुनिक सुविधांनी सज्ज वाहने, सांगलीतील आरटीओ कार्यालयाचे स्ववास्तूत स्थलांतर,जत पूर्व भागातील वंचित ६४ गावांसाठी स्वतंत्र पाणीयोजना, सांगली-पेठ रस्ता ही कामे झाल्याने दिलासा मिळाला आहे.

जनतेचे प्रतिनिधी काय म्हणतात...शिराळा येथील नागपंचमीला २३ वर्षानंतर जिवंत नागांची पूजा करण्यास सुरुवात झाली. छत्रपती संभाजी महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लोकनेते शिवाजीराव देशमुख यांच्या स्मारकांसाठी निधी मंजूर झाला. डाव्या कालव्यावरील उपसा जलसिंचन योजना पूर्ण करून वंचित गावांना पाणी उपलब्ध करण्याचे काम अजून पूर्ण करायचे आहे. - आमदार सत्यजित देशमुख, शिराळाकेंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून रिंग रोडसाठी निधी मिळाला. मात्र, स्थानिक स्तरावर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी देताना विरोधकांबाबत दुजाभाव केला जातो.- आमदार रोहित पाटील, तासगाव-कवठेमहांकाळवर्षभरात आयर्विन पुलाचा पर्यायी पूल खुला झाला, विश्रामबाग नाट्यगृहाचे काम मार्गी लागले. पुढील कालावधित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा विकास, शेरीनाला शुद्धिकरण योजनेतून नदी प्रदूषण थांबविण्याची महत्त्वाचे काम मार्गी लावायचे आहे. राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. - आमदार सुधीर गाडगीळ, सांगलीमिरज शहराला जोडणारे सर्व महत्त्वाचे रस्ते आम्ही रुंद करीत आहोत. शासनाकडून वर्षभरात मोठा निधी मिळाला. छत्रपती शिवाजी रस्त्याचे काम मार्गी लागले. कुमठे फाटा ते म्हैसाळ रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. पंचायत समिती इमारत, ग्रामपंचायतींच्या इमारती प्रशस्त केल्या. बेडग-आरग दरम्यान रेल्वे उड्डाणपूल झाल्यानंतर रेल्वेफाटकमुक्त मतदारसंघ होईल. - आमदार सुरेश खाडे, मिरज

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District: Roads, Bridges Built, Tourism, Industry Projects Lagging Behind

Web Summary : Sangli saw road and bridge projects completed in the past year. Tourism and industrial development still lags. Key promises like logistic parks and addressing drought remain unfulfilled.