मिरजेत प्रभाग चारमध्ये रस्ते कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST2021-07-02T04:18:23+5:302021-07-02T04:18:23+5:30

सांगली : मिरजेतील प्रभाग चारमधील शनिवार पेठ, गणपती मंदिर ते शिवनेरी चौक ते जिलेबी चौक आणि टांगसाळ मारुती मंदिर ...

Road work started in Miraj ward four | मिरजेत प्रभाग चारमध्ये रस्ते कामाला सुरुवात

मिरजेत प्रभाग चारमध्ये रस्ते कामाला सुरुवात

सांगली : मिरजेतील प्रभाग चारमधील शनिवार पेठ, गणपती मंदिर ते शिवनेरी चौक ते जिलेबी चौक आणि टांगसाळ मारुती मंदिर ते स्वातंत्रवीर सावरकर चौक या रस्त्याच्या डांबरीकरणाला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. यावेळी सुरेश आवटी, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, नगरसेवक निरंजन आवटी, मोहना ठाणेदार, योगेश शिरगूरकर, डॉ. भालचंद्र साठ्ये, सतीश शिंदे, माधव गाडगीळ, शोभा गाडगीळ, सागर चौगुले, सूर्यकांत कदम, अस्लम कलावंत, सुमेध ठाणेदार, संदीप सलगर, विजय केरीपाळे, प्रल्हाद सांगलीकर उपस्थित होते.

-----

राष्ट्रवादी पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने युवक व महिला तालुकाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दहा तालुक्यांतील अध्यक्ष निवडी होणार आहे. त्यासाठी १० जुलैपर्यंत पक्षाकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

--------

शंभर फुटीवर खड्ड्याचे साम्राज्य

सांगली : शहरातील शंभर फुटी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे असल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. तरी महापालिकेने तातडीने पॅचवर्क करण्याची मागणी होत आहे.

--------

Web Title: Road work started in Miraj ward four