भैरेवाडी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:33 IST2021-09-09T04:33:07+5:302021-09-09T04:33:07+5:30

वाटेगाव : भैरेवाडी (ता. शिराळा) येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एस.टी. थांबा ते येळवे धरणाकडे जाणाऱ्या ८० लाख खर्चाच्या ...

Road work started at Bhairewadi under Mukhyamantri Gram Sadak Yojana | भैरेवाडी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू

भैरेवाडी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू

वाटेगाव : भैरेवाडी (ता. शिराळा) येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एस.टी. थांबा ते येळवे धरणाकडे जाणाऱ्या ८० लाख खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा आरंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार नाईक म्हणाले, या विभागातील कामे प्राधान्याने पूर्ण करण्याकडेच माझा प्रयत्न राहील.

प्रारंभी युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने यांनी स्वागत केले. आमदार नाईक यांच्या हस्ते रस्ते कामाचा आरंभ झाला. याप्रसंगी माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक, विश्वासचे संचालक विश्वास पाटील, राजेंद्र बोबडे, बाजार समितीचे संचालक अण्णा बेंद्रे, मारुती येळवे, अनंत सपकाळ, माजी सरपंच मोहन चाळके, सरपंच विलास येळवे, उपसरपंच कृष्णा माने, सोसायटी अध्यक्ष नामदेव बोबडे, संजय पाटील, दर्शन पाटील, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : ०८ वाटेगाव १

ओळी : भैरेवाडी (ता. शिराळा) येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झलाे. यावेळी सम्राटसिंग नाईक, विलास येळवे, विश्वास पाटील, राजेंद्र बोबडे, अण्णा बेंद्रे उपस्थित हाेते.

Web Title: Road work started at Bhairewadi under Mukhyamantri Gram Sadak Yojana