विहिरीच्या कामासह रस्ते गटारीची कामे मार्गी लावणार : वैभव शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:54+5:302021-05-31T04:19:54+5:30
आष्टा : आष्टा शहरातील शिराळकर कॉलनी मधील विहिरीसह रस्ते, गटारींची विविध विकास कामे तातडीने मार्गी लावण्यात येतील, ...

विहिरीच्या कामासह रस्ते गटारीची कामे मार्गी लावणार : वैभव शिंदे
आष्टा : आष्टा शहरातील शिराळकर कॉलनी मधील विहिरीसह रस्ते, गटारींची विविध विकास कामे तातडीने मार्गी लावण्यात येतील, असे प्रतिपादन आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी केले.
येथील शिराळकर कॉलनीत सुमारे १०० वर्षांपूर्वीची विहीर आहे. सध्या ती विहीर पूर्णपणे मोडकळीस आली असून, दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे येथील कॉलनीमधील नागरिकांनी धोकादायक विहीर तातडीने बुजवून घेण्याबाबत पालिकेकडे वेळोवेळी मागणी केली होती. नागरिकांनी वैभव शिंदे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. कॉलनीमध्ये रस्ते, गटारीच्या प्रश्नाबाबत माहिती घेऊन पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, अभियंता गिरीश शेंडगे व पाणीपुरवठा अधिकारी सचिन मोरे यांच्याशी चर्चा करून हे काम तातडीने मार्गी लावण्यास सांगितले.
यावेळी सुरेंद्र शिराळकर, श्रीराम ढोले, गुंडाजी कुराडे, राजू पाटील, सुरेश कोळी, डॉ संदीप देसाई, संतोष गावडे, दिलीप पवार, संतोष शिंगटे, देवीलाल माळी, वरदराज शिंदे, कुमार देसावळे, श्रेयश शिराळकर, इंद्रजित हिरुगडे, दत्तराज हिप्परकर, सागर जगताप आदी उपस्थित होते.
फोटो: ३००५२०२१-आयएसएलएम-आष्टा न्यूज : आष्टा येथील शिराळकर कॉलनीतील धोकादायक विहिरीची पाहणी वैभव शिंदे, अभियंता गिरीश शेंडगे, सचिन मोरे यांनी केली.