जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरतर्फे रस्ता सुरक्षा अभियान साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:47 IST2021-02-18T04:47:14+5:302021-02-18T04:47:14+5:30
इस्लामपूर : येथील जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आंबेडकर नाका ते प्रकाश हॉस्पिटल या ठिकाणी ...

जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूरतर्फे रस्ता सुरक्षा अभियान साजरा
इस्लामपूर : येथील जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आंबेडकर नाका ते प्रकाश हॉस्पिटल या ठिकाणी चार दिशादर्शक फलक उभा करण्यात आले. त्या फलकांचे अनावरण सांगलीचे मोटार वाहन निरीक्षक सागर चौगुले आणि इस्लामपूरच्या वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव यांच्या हस्ते झाले. जायंट्सने उभा केलेल्या या दिशादर्शक फलकांमुळे होणारे अपघात टाळण्यास मदत होईल, असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी जायटसचे अध्यक्ष दुष्यंत राजमाने, खजिनदार अॅड. श्रीकांत पाटील, युनिट डायरेक्टर नितीन शहा व भूषण शहा, युनिट ऑफिसर नितीन पारेख, डॉ. नितीन पाटील, डॉ. सदानंद जोशी, अमेय शहा, अर्जुन पाटील, ईश्वरभाई पटेल उपस्थित होते.
फोटो - १७०२२०२१-आयएसएलएम- जायटस् न्यूज