टाकळीत महामार्गाच्या कामासाठी खोदलेला रस्ता धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:00+5:302021-09-06T04:30:00+5:30
ओळ : टाकळी (ता. मिरज) येथे महामार्गाच्या कामासाठी खाेदलेला रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. टाकळी : टाकळी (ता. ...

टाकळीत महामार्गाच्या कामासाठी खोदलेला रस्ता धाेकादायक
ओळ : टाकळी (ता. मिरज) येथे महामार्गाच्या कामासाठी खाेदलेला रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.
टाकळी : टाकळी (ता. मिरज) येथे हेरवाड-दिघंची महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र ठेकेदाराने गावातील रस्त्याचे काम अपूर्ण ठेवले आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त टाकलेल्या खडीमुळे लहान-माेठे अपघात नित्याचेच झाले आहेत. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता ते याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
टाकळी येथे हेरवाड-दिघंची महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र टाकळी येथे गावातील रस्ता अपूर्ण ठेवण्यात आला आहे. गटारीसाठी रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेले खड्डे व्यवस्थित भरले नसल्याने अनेक वेळा येथे अपघात झाले आहेत. रस्ता अर्धवट खोदून सोडण्यात आल्याने खडीवरून वाहने घसरत आहेत. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले असता त्यांच्याकडून चालढकल करण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गावातील रस्ता त्वरित पूर्ण करावा व अपघातास निमंत्रण ठरत असलेले खोदलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.