झरेत आठवडाबाजारामुळे रस्ताच ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST2021-02-09T04:30:26+5:302021-02-09T04:30:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दिघंची : झरे (ता. आटपाडी) येथे दरसोमवारी झरे-खरसुंडी रस्त्यावर आठवडाबाजार भरतो. हा रस्ता मुळातच अरुंद ...

झरेत आठवडाबाजारामुळे रस्ताच ब्लॉक
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : झरे (ता. आटपाडी) येथे दरसोमवारी झरे-खरसुंडी रस्त्यावर आठवडाबाजार भरतो. हा रस्ता मुळातच अरुंद असल्याने बाजारामुळे वाहतूककोंडीची समस्या नित्याची बनली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती कायम असल्याने प्रशासनाने कायमस्वरूपी बाजाराची व्यवस्था करावी व वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
झरे हे आटपाडी तालुक्यातील शेवटच्या टोकाचे गाव आहे. या ठिकाणी बाजारासाठी सातारा जिल्ह्यातील काही गावांतील नागरिकही येतात. झरे परिसरातील वाड्यावस्त्यावरील नागरिकांसाठी हा बाजार सोयीचा आहे. यामुळे मोठी गर्दी होत असते. आठवडाबाजारासाठी सोयीची जागा उपलब्ध नसल्याने भाजीपाला विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांबरोबर वाहनधारकांची दमछाक होत असते. हा रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. बऱ्याचवेळा विक्रेत्यांबरोबर वाहनचालकांचा वादही होतो.
कोट
झरे ते खरसुंडी रस्ता अरुंद आहे. याच रस्त्यावर आठवडाबाजार भरत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. प्रशासनाने बाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून नागरिकांची सोय करावी व वाहतुकीसाठी रस्ता सुरळीत करावा.
- धनंजय वाघमारे,
आरपीआय तालुका संघटक
फोटो-०८दिघंची१ व २
फोटो ओळी:- झरे ता. आटपाडी येथे झरे-खरसुंडी रस्त्यावर भरत असलेला आठवडाबाजार.