कोकरूड पोलिसांकडून नदी, ओढ्याकाठी बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:21+5:302021-09-15T04:31:21+5:30
कोकरूड : चांदोली धरणातून पाणी सोडल्याने वारणा नदीचे पात्र दुथडी वाहत आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने शिराळा ...

कोकरूड पोलिसांकडून नदी, ओढ्याकाठी बंदोबस्त
कोकरूड : चांदोली धरणातून पाणी सोडल्याने वारणा नदीचे पात्र दुथडी वाहत आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने शिराळा पश्चिम भागातील सर्व ओढे भरून वाहत असल्याने कोकरूड पोलिसांकडून पोलीस आणि होमगार्ड यांचा महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी दिली.
चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यातच सकाळपासून अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे पश्चिम भागातील सर्व ओढे भरून वाहत आहेत. घरगुती, तसेच काही मंडळांचे गणपती विसर्जन होणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मणदूर, आरळा, चरण, मोहरे, नाठवडे, कोकरुड, बिळाशी, मांगरुळ या नदी काठी, तसेच खिरवडे, हत्तेगाव, येळापुर, गवळेवाडी, रांजणवाडी, शिरसटवाडी, काळुद्रे यासह पणुब्रे परिसरात पंधरा पोलीस आणि वीस होमगार्ड यांची विसर्जन ठिकाणी नेमणूक केली आहे.